देवणी लक्ष्मण रणदिवे
निलंगा येथील महाराष्ट्र विद्यालयात महाराष्ट्र राज्य युवक व क्रीडा संचना लय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर व लातूर जिल्हा लंगडी क्रीडा असोशियान यांच्या संयुक्त विदयमाने जिल्हास्तरीय लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक श्री पवार डी. डी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत लोदगेकर,राज्य क्रीडा मार्गदर्शक,लातूर पर्यवेक्षिका श्रीमती एस. डी देशमुख या होत्या. उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री पवार म्हणाले की, प्रत्यकजण विजय मिळविण्यासाठी खेळत असतो.पण ज्या सघातील खेळाडू विजयात आपला अधिक सहभाग असावा यासाठी खेळतो तोच संघ विजय होतो.आपण निर्भय पणे, आनंदी वातावरणात खेळावे अश्या शुभेच्छा खेळाडूंना दिल्या.लंगडी स्पर्धेत मुलाचा संघ भाग घेत असल्याबद्दल श्रीमती देशमुख यांनी आनंद व्यक्त करून त्यांना शुभेच्छा दिल्या.क्रीडा शिक्षक श्री सय्यद यांनी व त्याचा सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
