देवणी लक्ष्मण रणदिवे
देवर्जन मध्यम प्रकल्पातून देवणीकरांना कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी म्हणून सतत मंत्रालयात पाठपुरावा करून तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार दिलीप सोपल यांच्या स्वाक्षरीने प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यानंतर थोड्याच दिवसात ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायत कार्यरत झाली. पण मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांनी देवर्जन मध्यम प्रकल्पातून देवणी ला पाणी कशा पद्धतीने घेऊन येता येते याचा सतत पाठपुरावा चालू ठेऊन ती फाईल कायम शासनाच्या दरबारी लागणारे कागदपत्रे आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते कधीही दहजले नाहीत. देवनी नगरपंचायत अस्तित्वात आली आणि काँग्रेस पक्षाची सत्ता गेली. तेव्हा तमाम देवनीकरांना वाटले होते की आता देवणीला देवर्जन मध्यम प्रकल्पातून पाणी येणार नाही. असे देवनीकरांना साहजिकच होते. कारण गल्ली ते दिल्लीत भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना तत्कालीन नगराध्यक्ष व त्यांच्या टीमने पण प्रयत्न केले पण ते सफल झाल्याचे दिसून आले नाही. नंतर नगरपंचायती वरती काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आल्यानंतर प्रथमता नगराध्यक्ष डॉ कीर्तीताई संजय घोरपडे अमित मानकरी विशेषता देवणी शहरातील युवकाचे प्रेरणास्थान असलेले डॉ संजय घोरपडे व त्यांच्या सर्व टीमने अहोरात्र प्रयत्न करून मल्लिकार्जुनप्पा मानकरी सावकार यांच्या आशीर्वादाने गेले वीस वर्षाचे देवनीकरांचे स्वप्न साकार करण्यात यशस्वी झाले असल्याचे आज दिसून आले. तमाम देवणीकरांच्या वतीने देवणीकरांचे २० वर्षाचे स्वप्न साकार करणारे मल्लिकार्जप्पा मानकरी सावकार व सन्माननीय नगरसेवकांचे जाहीर अभिनंदन देवर्जन मध्यम प्रकल्पातून देवणीशहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रथमता तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री तथा आमदार दिलीप दादा सोपल, माजी पालकमंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री कै शिवाजीराव पाटील निलंगेकर , माजी पालकमंत्री आनंदराव देवकते माजी आमदार रामचंद्र नावंदीकर, वैजनाथ लुल्ले, अमर पाटील ,माजी सरपंच काशिनाथ मानकरी माजी सरपंच कै.राजकुमार बंडगर , माजी सरपच अंजलीताई जीवने, माजी सरपंच देविदास पतंगे, सलीम भाई मिर्झा,भारतीय जनता पार्टीचे प्रथम नगराध्यक्ष विद्याताई रमेशदादा मनसूरे, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष वैजनाथ अष्टुरे सावकार आणि आत्ताच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉ कीर्तीताई घोरपडे व देवणी शहरातील युवकाचे मार्गदर्शक तथा प्रेरणास्थान डॉ संजय दादा घोरपडे या सर्वांना नगराध्यक्ष कीर्तीताई घोरपडे उपनगराध्यक्ष अमित मानकरी व नगरसेवकांना त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर देवणीला आली यश
