Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विश्वजीत गायकवाड ची रॅली म्हणजे सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक





उदगीर (प्रतिनिधी)


उदगीर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या समाजकार्याचा दाखला देत उदगीर, जळकोट तालुक्यातून हजारो युवक, तरुण वयोवृद्ध यांनी उदगीर मध्ये अपक्ष उमेदवार विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत लातूर जिल्ह्याच्या राजकारणाला उदगीर विधानसभा मतदार संघाने वेगळे वळण दिले हे चिन्ह दाखवले आहे. या रेकॉर्ड ब्रेक गर्दीमुळे सर्वच राजकीय पक्षाची गणिते बिघडली आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उदगीरचे अपक्ष उमेदवार विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांनी जनतेला आवाहन केले होते, मी 29 तारखेला उमेदवारी अर्ज भरतोय तुम्ही या, आणि अक्षरशः जनसागर उसळला ! संपूर्ण महाराष्ट्राची लक्षवेधी ठरलेली उदगीर विधानसभा निवडणूक या अफाट गर्दीमुळे बहुचर्चित झाली. प्रसिद्धी माध्यमातील सर्वच घटकांनी याची नोंद घेतली. मग ते प्रिंट मीडिया असतील, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, युट्युबर्स असतील, सर्वांनी याची दखल घेतली, एक अपक्ष उमेदवार संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतो ही गोष्ट सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावणारी होती. विशेषतः उदगीर विधानसभा मतदारसंघांमध्ये सध्याचे प्रतिनिधी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या विरुद्ध इंजिनीयर विश्वजीत अनिल कुमार गायकवाड यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार यासंदर्भात आता कोणती शंका राहिली नाही, भरीस भर म्हणजे याच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार सुधाकर भालेराव हेही रिंगणात आहेत. असे असताना देखील जवळपास 40 हजार लोकांचा जनसमुदाय विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या रॅलीमध्ये आल्यामुळे उदगीर शहरातील सर्व रस्ते जाम झाले होते. बंजारा समाजाच्या महिला पारंपारिक नृत्य करत, वेशभूषेमध्ये अत्यंत आनंदाने विश्वजीत गायकवाड यांना आशीर्वाद देत होत्या. त्या सोबतच वासुदेवाची स्वारी, तसेच स्थानिक वाद्यांच्या गजरात ही रॅली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करून पुढे जात होती. रस्त्याच्या दुतर्फा सुद्धा सर्व समाजाच्या, धर्माच्या जातीच्या लोकांनी विश्वजीत गायकवाड यांच्या हार तुरे स्वीकारत, फुलांची उधळण होत असताना सगळ्यांना अभिवादन करत विश्वजीत गायकवाड पुढे जात होते. 

याच दरम्यान उदगीर विधानसभा मतदार संघाचा निकाल बदलू शकतील असे रथी महारथी ज्यामध्ये प्राधान्य क्रमाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बसवराज पाटील कोळखेडकर, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बापूसाहेब राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव परगे, जळकोटचे माजी नगराध्यक्ष किशनराव धूळशेटे, भाजपचे नेते नंदकुमार नळंदवार, भाजपचे नेते मनोहर भंडे, माजी नगरसेवक नागेश अष्टुरे, माजी नगरसेवक राजकुमार मुक्कावार, जळकोटचे माजी नगरसेवक बाळूशेटे यांच्यासह अनेकांनी रस्त्यावर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांचे स्वागत आणि सत्कार करून विजयी भव अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला.

 यामुळे या रॅलीतील तरुणांना नवचैतन्य प्राप्त झाले. अत्यंत उत्साहात या तरुणांची रॅली विरोधकावर टीका टिप्पणी न करता आपली सकारात्मक बाजू मांडत आपण विकासासाठी काय काय करू शकतो? ही विचारधारा मांडत होते. ज्यामध्ये प्राधान्य क्रमाने शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहकार्य, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवून प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न या सोबतच त्यांनी आजपर्यंत केलेल्या समाजकार्याचाही उहापोह या रॅलीच्या दरम्यान झाला.

        याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार डॉ. सुनील कुमार गायकवाड, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक धरमपाल देवशेट्टे, नगरसेवक तथा राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगवे, एमआयएमचे नेते नौशाद मौलाना यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रॅलीच्या पूर्वी झालेल्या विश्वजीत अनिल कुमार गायकवाड यांच्या सभेला संबोधित केले. हे विशेष आहे. 


चौकट.....


विश्वजीत गायकवाड सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरतील !


विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या प्रचार रॅलीच्या दरम्यान हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, मातंग या सर्वच जाती, धर्मातील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. आम्हाला परिवर्तन पाहिजे, असाच जणू संदेश देत होते. याचे उदाहरण म्हणून एक बोलका फोटो आपल्याला सर्व काही सांगून जाईल. यामध्ये एक वयोवृद्ध मुस्लिम माणूस भगवा झेंडा फडकवतोय, दुसरा एक तरुण हिरवा झेंडा फडकवतोय, तर तिसरा एक तरुण विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला निळा झेंडा फडकवतोय! हे चित्र आजपर्यंतच्या कोणत्याही रॅलीमध्ये दिसून आले नव्हते, ते आज दिसून आले!! हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर विश्वजीत गायकवाड यांच्या पाठीशी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षातील अनेक नाराज घटक पूर्ण ताकतीने उभे असलेले पाहायला मिळतात. आणि जनसामान्यांमध्ये आजी नको, माजी नको ,आम्ही सर्व विश्वजीत गायकवाडच्या नावावर राजी !! राहणार असाच जणू संदेश दिला गेला आहे. तब्बल 40 हजाराहून अधिक लोकांची ही झालेली रॅली पाहून लोक बोलत होते, विश्वजीत गायकवाड जॉईंट किलर ठरतील! आणि ह्या चर्चेतून विश्वजीत गायकवाड यांचे एक वेगळेपण लोकांच्या समोर येऊ लागले आहे. स्वखर्चाने हजारोंचे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणारा हा तरुण निश्चितपणे उदगीर विधानसभा मतदार संघासाठी काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतोय; धडपडतोय, या संदर्भात फार मोठी चर्चा विधानसभा मतदारसंघात चालू आहे. विश्वजीत गायकवाड हे नाव ज्यांना माहितीही नव्हते ते आज छोटे छोटे विद्यार्थी, ते वयोवृद्ध माणसे विश्वजीतच्या नावाचा जणू जप करत आहेत. हा आदर्श निर्माण करायला विश्वजीत गायकवाड यांनी मोठी समाजकार्य केले आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही, आणि ही रॅली म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरली हे तर आता मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस बोलून दाखवत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.