Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मानवी हक्क अभियानाच्या वतीने मतदार जनजागृती मोहीम



देवणी लक्ष्मण रणदिवे


मानवी हक्क अभियान ही संघटना शोषित,दलित,शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी,कामगार, दुर्बल घटक,महिला बालके,व सर्व मानवाच्या कल्याणासाठी सनदशीर मार्गाने कडवा लढा देणारी संघटना असुन समाजात संविधानिक मुल्यं रुजवुन लोकशाही मजबुत करणे त्या बरोबर समजात प्रभावी समता व बंधुत्व निर्माण करणे हे संघटनेचे उद्देश आहे.या संघटनेचे निर्माण कर्मवीर एकनाथ आव्हाड यांनी केले तर या संघटनेचे नेतृत्व जवाहरलाल नेहरू इन्व्हरसीटी मध्ये कार्यरत असलेले जगविख्यात विचारवं भारतीय लोकशाहीचे विश्लेषक मा.मिलींदजी आव्हाड हे करीत आहेत.अभियानाचा न्यायाचा संघर्ष १९९०पासुन आजतागायत चालु आसुन,त्यांचाच एक भाग म्हणुन या विधानसभेच्या निवडणुकीत अभियानांकडुन मतदार जन जागृती मोहीम राबविण्यात आली आहे,लातुर जिल्ह्यातील उदगीर,जळकोट,देवणी या तीन तालुक्यात ही जनजागृती मोहीम जोरदार पणे राबविण्यात आली आहे,आपले मत हे आपला आमुल्य अधिकार आसुन कुठल्याही भुलथापांना बळी न पडता योग्य पक्षाच्या बळकटीसाठी योग्य उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपल्या मतांचा योग्य उपयोग करा अशी शिकवण या मोहिमे दरम्यान देण्यात आली,संविधानिक मुल्यांविरुध्द मनसुबे करणाऱ्या, जाती धर्मात द्वेष पसरवुन धर्मनिरपेक्षेतेला तडा देऊ पहाणाऱ्यां,पवित्र संविधानाच्या विरुद्ध द्वेष पसरविणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करु नये तर त्यांना धडा शिकवावा आसे ही या जनजागृती मोहीमे दरम्यान सांगण्यात आले आहे,तर संविधान व संविधानिक मुल्यांचा सन्मान राखणाऱ्यां,देशात समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न शील आसणाऱ्यां,सामाजिक न्यायावर विश्वास ठेऊन सामाजिक न्यायाची अमल बजावणी  करणाऱ्या,भारताची एकता व आखंडता,बंधुत्व निर्मिती साठी बांधील आसणाऱ्यां पक्षाच्याचं उमेदवाराला आपले आमुल्य, पवित्र मत देऊन देशाच्या एकता व एकात्मेस बळकटी आणावे आसे आव्हान ही या जनजागृती मोहीमेत दरम्यान देण्यात आले.तीन तालुक्यातल्या या मोहिमेचे नेतृत्व लोकशाही समर्थक लक्ष्मण रणदिवे लातुर जि.उपाध्यक्ष यांनी केले, 

तर ही मोहीम नळगीर गावचे सुपुत्र,मानवी हक्क अभियानाचे लातुर जिल्हा सचिव,मारुती गुंडीले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली,ही मोहीम राबविण्याकामी मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते लक्ष्मण रणदिवे लातुर जि.उपाध्यक्ष सह गजानन गायकवाड देवणी ता.आध्यक्ष  संग्राम घुमाडे  जळकोट ता.आध्यक्ष अश्विनी वाघमारे महिला आघाडी अध्यक्षा जळकोट मीना वाघमारे महिला आघाडी ता.सचिव डि.एन.कांबळे देवणी ता.सचिव अनिल घोडके जळकोट ता.सचिव श्रीकांत सुर्यवंशी उदगीर ता.आध्यक्ष गोविंद शिंदे उदगीर ता.सचिव हरिभाऊ राठोड जळकोट ता.सहचिव  प्रवीण चव्हाण सर्कल प्रमुख घोणसी इत्यादींनी सहभाग घेतला होता.आचार संहितेचा सन्मान राखुन चार,चार कार्यकर्ते चा ग्रुप करुन प्रत्येक गावातील कार्यकर्तेच्या निवास स्थानी बैठका घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.या आभियांनाच्या मतदार जनजागृती मोहीमेचे लोकशाही प्रेमी कडुन कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.