देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील कोतवाल संघटने कडून काम बंद आंदोलनाचे निवेदन सोमवारी (दि.२३) तहसील प्रशासनास देण्यात आले आहे. राज्यस्तरीय कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा व इतर प्रलंबित मागण्यांसाठी
लातूर व देवणी येथील कोतवाल संघटनेने प्रशासनास निवेदन देऊन सोमवारपासून कामबंद आंदोलन सुरु केल्याचे कळविले आहे. दि.२४ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय काम बंद, दि.२५ सप्टेंबरपासून राज्यभर कामं बंद आणि दि.२६सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे मागण्या पूर्ण होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. देवणी तालुका कोतवाल संघटनचे तालुकाध्यक्ष गणेश ईदलकंटे, उपाध्यक्ष तुकाराम रामसाने, सचिव वेंकटरमना बिजापुरे, महेश वडले, अनिल येलमटे, भाग्यश्री मोघे, अनुराधा विभुते, भाग्यश्री सूर्यवंशी, देविदास धनासुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनावर लातूर कोतवाल संघटनेचे दिनेश जब उटगे, गजानन शिंदे, दामोदर माने, वाल्मिक पांढरे, गोविंद गाडेकर, संदीप माळी आदींसह पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.
