देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- आत्मा विभागाच्या शेतकरी उपयोगी अनेक योजना असून यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बांधावर व गावांमध्ये जाऊन उत्कृष्ट तंत्रज्ञान प्रचार प्रसिद्धी. राहुल जाधव महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत मौजे कोणाळी येथे नाथ मंदिर सभागृहामध्ये खरीप हंगाम किसान कोष्टी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.कृषी विभागाच्या आत्मा या यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्रकल्प संचालक आत्मा श्री एस व्ही लाडके आणि प्रकल्प उपसंचालक श्रीमती बांगर मॅडम यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली व तालुका कृषी अधिकारी आणि तालुका कृषी कार्यालयातील कार्यरत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि तालुका कृषी कर्मचारी यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिके, शेतकरी अभ्यास दौरे, राज्यस्तरीय शेतकरी प्रशिक्षण राज्याबाहेरील शेतकरी प्रशिक्षण दौरे, शेतकरी उत्पादक कंपन्याचे निर्मिती व सक्षमीकरण, बाळासाहेब ठाकरे ग्रामीण कृषी व्यवसाय व्यवस्थापन यंत्रणा" स्मार्ट, शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ट पीक मार्गदर्शन बांधावरती उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या हंगामी हाय पीकनिहाय शेतीशाळा, शेतीपूरक व्यवसायावरती कौशल्य आधारित शेती पूरक शेती शाळा, कृषी महोत्सव आयोजन, कृषी प्रदर्शन आयोजन, शेतकऱ्यांचे विविध पिकावर ती विविध शेतीपूरक व्यवसायावर ती शेतकरी गट व महिला शेतकरी गट निर्मिती सक्षमीकरण बळकटीकरण, शेतकरी गट योजना, शेतकरी गटांना फिरता निधी व बीजोत्पादन कार्यक्रम, वैयक्तिक महिला पुरुष शेतकरी पुरस्कार योजना, महिला शेतकरी गट पुरस्कार योजना, विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत भाजीपाला किट वाटप योजना, परसबाग योजनेअंतर्गत महिलांना भाजपाला किट वाटप योजना या व अशा अनेक उत्कृष्ट योजना अत्यंत सक्षमी व प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. कृषी विभागाचा आत्मा शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन तर हंगामामध्ये सज्ज असतो.याचाच भाग म्हणून खरीप हंगाम किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन कोणाळी येथील नाथ मंदिरामध्ये यशस्वी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रावणगाव तालुका उदगीर येथील राज्यस्तरीय तूर उत्पादक पुरस्कार विजेता शेतकरी श्री भीमराव डोंगापुरे उपस्थित होते तर मुख्य मार्गदर्शक म्हणून कृषी सहाय्यक प्रियतम कारभारी, प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील उपस्थित होते.प्रसंगी बीटीएम राहुल जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित शेतकऱ्यांना "खरीप हंगाम किसान गोष्टीचे" महत्त्व पटवून देत सोयाबीन, मूग, उडीद, तीळ आणि तूर या पिकाच्या बियाणे निवड पासून ते उत्पादनापर्यंत ज्या गोष्टी ज्या उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान अवलंबिले होते व यापेक्षा अधिक चांगले कोणते , कसे व पुढील हंगामात त्याचा प्रभावीपणे वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून व्यवसायाकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. कृषी सहाय्यक प्रियतम कारभारी यांनी सोयाबीन आणि कापूस या संदर्भातील अनुदान वाटपा संदर्भात उर्वरित शेतकऱ्यांनी इ -केवायसी करणे अत्यंत गरजेचे असून शेतकरी इ केवायसी करावे असे आवाहन केले व कृषी विभागाच्या महाडीबीटी मागील त्याला शेततळे इत्यादी योजनाबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करताना श्री भीमराव डोणगापुरे यांनी शेतकऱ्यांनी शास्त्रज्ञ होऊन शेती केली पाहिजे जिद्द कष्ट चिकाटी बचत या सर्व गोष्टी अवलंबून शेती करावी शेतीला शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय पशुपालन रेशीम शेती इत्यादीचा अवलंब करावा व तुर पिकामध्ये बायोमिक्स आणि तूर खुडणी या दोनतंत्रज्ञानाचा वापर करून तूर उत्पादन वाढवावे याबाबत मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमासाठी गावातील महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचे सर्व आयोजन श्रीमती रंजना पोलकर यांनी केले.
