देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील देवणी खुर्द या गावचे शिक्षक हे कमालवाडी येथे मुख्याध्यापक पदावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमालवाडी येथे रुजू आहेत ते त्यांचा वडिलांचा व्यवसाय बूट चप्पल बनवून विक्री करणारे या अतिशय गरीब परिस्थितीतुन त्यांना शिक्षण देऊन नोकरीला लागेपर्यंत सतत मेहनत कष्ट करत होते त्यांचा मुलगा शिक्षणात हुशार असल्यामुळे डीएड करून शिक्षक बनले, तसेच त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आल्यावर शिक्षक पदावर राहून आपल्या बहिणीचे व पत्नीचे शिक्षण पूर्ण करून दोघींनाही नोकरी लावण्याचा प्रयत्न केले आहे ही गरिबी आपल्याच नशिबी आहे असं समजून शिक्षणाला महत्त्व दिले आज त्या शिक्षणाचं महत्व काय आहे हे अनुभव शिक्षक पदापासून मुख्याध्यापक पदापर्यंत जाण्याचा योग आला आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थी माझे दैवत आहेत समजून विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतो म्हणून आज मला जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार २०२४ चा जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे तरी देवणी खुर्द येथील शिक्षक असणारे श्री विश्वनाथ धोंडीबा उदबाळे यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल गावातील सरपंच, यशवंत कांबळे, उपसरपंच विठ्ठल शिगडे, मनोहर पाटील, रमेश कांबळे, मुलतानी पठाण, अनिल कांबळे, सुभाष पाटील, बापूराव उगिले, संजय गरड,पत्रकार लक्ष्मण रणदिवे, शंकर पाटील, यादुल पठाण, भैय्यासाहेब देवणीकर, लक्ष्मण मेह्ञे, प्रभू काकनाळे, सर्व गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे,
