देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणीः-स्वर्गीय आशोकअण्णा मन्मथअप्पा लुल्ले यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ देवणी शहरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.प्रथमत: स्वर्गीय आशोकअण्णा लुल्ले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दिप प्रज्वलन करण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठनेते मल्लिकार्जुनअप्पा मनकरी भाजपाचे जेष्ठनेते हावगीराव पाटील, व्यापारी माणिकराव लांडगे, जेष्ठ विधिज्ञ एस.एम. बिराजदार, काँग्रेसचे नेते अभयदादा साळुखे, मल्लिकार्जुन डोंगरे,जेष्ठ शेतकरी व्यकटराव देवणे. माजी नगराध्यक्ष वैजनाथअण्णा आष्टुरे तालुकाध्यक्ष काशिनाथ गरिवे, उपनगराध्यक्ष अमित मानकरी, मनोहर पटणे, वैजनाथ लुल्ले रमेश मनसुरे, प्रा डॉ. अनिल इंगोले, नगरसेवक किशोरजी निडवचेसर, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन सचिन मगनाळे य प्रस्ताविक नरसिंगराव सुर्यवंशी यांनी केले त्यानंतर लागलीच रक्तदान शिबिराचे आयोजन जेष्ठ विधिज्ञ एस एम बिराजदार सरांच्यावतीने करण्यात आले. रक्तदान शिबिरात एकुण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नरसिंग सोपानराव सुर्यवंशी, व्यापारी असोसियनचे अध्यक्ष सोमनाथ लुल्ले, माजी प्राचार्य गोपीनाथ सगर वि.का. सो चेअरमन विजयकुनार लुल्ले, चंद्रकात कारामुगे गुंडाप्पा कटे, गोविंद म्हेत्रे, आवेश सुर्यवशी याच्या सह स्व. आशोकअण्णा तुलुल्ले मित्र मंडळ व उद्योग समुहाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले रक्तदान शिबिरात उदगीर येथील नागप्पा अंबरखाने ब्लड बैंकेच्या वतीने १) डॉ. बी. एम. शेटकार, 2) सचिन कोनाळे, 3) सोमनाथ स्वामी 4) श्रीमती सपना कांबळे 5) श्रध्दा हासुरे 6) विनायक टकटवले. 7) सगमेश स्वामी यानी योगदान दिले.
