देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या तीन राज्यातील भाविकाचे श्रध्दास्थान असलेल्या कर्नाटकातील भवानी बिजलगाव( ता.कमालनगर ) येथे श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी श्री यल्लालिंग मुत्या महाराज मठात कै. योगीराज दत्तात्रय महाराज भवानी बिजलगावकर यांच्या समाधीस्थळी महाअभिषेक सोहळा व महाआरतीच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा परिसर श्रध्दास्थान भक्तीभावाने दुमदुमल्याचे दिसुन आले. गुंफा परिसरातील मठात मुख्य कार्यक्रमात कै योगिराज दत्तात्र्य महाराज समाधी स्थळाचे पूजन होऊन औदुंबर वृक्षाखालील महादेव पिंडीवर महाअभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर श्री यल्लालिंग मठ देवस्थानचे गुंफा प्रमुख पिराजी दत्तात्रय महाराज यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी डॉ. व्यंकटराव डोंबाळे तानाजी डोंबाळे, शिवकुमार मेहेत्रे नराजी कारभारी श्रीमंत महाराज सुभाष महाराज संग्राम रेड्डी गुंडप्पा संगमे तुकाराम कल्याणी सुनील पाचपिंडे माजी सभापती बालाजी बिरादार चंद्रशेखर महाजन गणेश महाजन यांच्यासह महाराष्ट्र ,कर्नाटक व तेलंगणा राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
