देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील तळेगाव भो,या गावात मोठा उत्सव बैल पोळा यानिमित्य सरत्या श्रावणी अमावस्येचा दिवस म्हणजे बैलपोळा आजच्या पेक्षा पूर्वी बैलपोळ्याला अनन्य साधारण महत्व होते. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जायचा तो आजा फक्त पोळा उरलाय अन बैल मात्र चिखलाचा राहिलाय. आज बैल पोळा बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांनी फळाच्या निमित्ताने बैलांना गावातील हनुमान मंदिराची प्रदक्षिणा घालून त्यांची मोठ्या उत्साहाने वाजत गाजत मिरवणूक काढून मनोभावे विधिवत पूजा करून पुरणपोळी चारून बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
[1:43 PM, 9/3/2024] Ugile Sir:
