देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील एकूण ८ विद्यार्थी NEET - २०२४ मध्ये वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झाले असून त्यांचा यथोचित सत्कार अंबानगर येथील राजकुमार रोट्टे परिवारातर्फे उत्कृष्ट प्रकारे करण्यात आला.तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड झालेल्या मुलांचाही यावेळी नियोजित सत्कार करण्यात आला.महाराष्ट् लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेतून अनिल शिवाजी ईंचूरे यांची कृषी सहायक म्हणून निवड झाली आहे तर सुनील केशव नरवटे यांची सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे.वैद्यकीय प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी १ शिवकुमार आबासाहेब भद्रे याने नीटमध्ये गुण घेऊन६८५ जे.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे निवड झाली आहे २ आदर्श राजकुमार रोट्टे याने ६५२ गुण घेऊन राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,ठाणे येथे निवड झाली आहे ३ साईप्रसाद माने याने ६७५ गुण घेऊन लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे निवड झाली आहे ४श्रृती माने या विद्यार्थीनीची ६६० गुण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे निवड झाली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ,फेटा व पुष्पहार घालून देवणी पोलीस निरिक्षक मानीक डोके,शिक्षण समितीचे राज्याचे नेते श्री किशनरावजी बिरादार, देवणी तालुका कृषी अधिकारी श्री पाटील साहेब,देवणी खु.येथील प्रा.पदवीधर शिक्षक श्री.केशव नरवटे, पोलीस जमादार विनायक कांबळे,गट साधन केंद्र देवणी येथील साधनव्यक्ती तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी निरंतर शिक्षण आबासाहेब भद्रे, मुख्याध्यापक धनराज चिद्रे,अनील कांबळे देवणी कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ रोटे,अनिल रोटे, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व रोट्टे कुटुंबाच्या नातलग यांनी यथोचित सत्कार केला यावेळी सर्वच मान्यवरांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन शुभेच्छारुपी आशिर्वाद दिले यावेळी देवणी तालुक्यातील या विद्यार्थीचे व नविन अधिकारी म्हणून निवड झालेल्या अधिकार्याचे अभिनंद पत्रकार लक्ष्मण रणदिवे,शकिल मनियार, गिरिधर गायकवाड, बालाजी टाळीकोटे,प्रा नरसिग सुर्यवशी,जयेश ढगे, भैयासाहेब देवणीकर,आदि सह अभिनंदन केले आहे,
