देवणी लक्ष्मण रणदिवे
देवणी - सॉफ्टटेक सोल्युशन्स अँड सर्विसेस, पुणे यांच्या वतीने कोहा आणि डीस्पेस या आज्ञावलीवर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच सफायर हॉटेल,लोणावळा येथे पार पडली. सदर कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील ४०प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यामध्ये संशोधक विद्यार्थी आणि महाविद्यालयीन ग्रंथपाल यांचा समावेश होता. प्रस्तुत कार्यशाळेमध्ये सॉफ्टटेक सोल्युशन्स अँड सर्विसेस पुणे आणि जे.एस. एंटरप्राइजेस पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा स्मार्ट ग्रंथपाल पुरस्कार २०२३ -२४ देवणी येथील कै. रसिका महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सेवानिवृत्त सहाय्यक ग्रंथपाल डॉ.भाऊसाहेब पानगे यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी सॉफ्टटेक सोल्युशन्स अँड सर्विसेसचे संचालक चेतन टाकसाळे, प्रलाद जाधव, राहुल देशमुख,डॉ. शहाजी वाघमोडे, संतोष चव्हाण, इद्रिस खान, रोहिणी टाकसाळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कै. रसिका महाविद्यालय ग्रंथालयाचे ई - ग्रंथालयाच्या माध्यमातून पूर्णतः संगणकीकरण करणे, सर्व पुस्तकांचे बारकोडींग करणे, वाचकांना ओपॅकची व ई - रिसोर्सेसची सुविधा देणे, ग्रंथालयात वाचकांच्या नोंदीसाठी युजर ट्रेकिंग सिस्टीम या आद्यावत आज्ञावलीचा वापर करणे, ग्रंथालय आणि माहितीशास्त्रातील राष्ट्रीय परिषदांचे आयोजन करणे. तसेच संशोधन, शैक्षणिक व सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल डॉ.शिवाजी सोनटक्के यांना स्मार्ट ग्रंथपाल पुरस्कार२०२३-२४ मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्थेचे सचिव मा. श्री गजाननजी भोपणीकर साहेब, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी डॉ. शिवाजी सोनटक्के यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा पत्रकार बांधव लक्ष्मण रणदिवे, गिरधर गायकवाड, शकील मणियार ,प्रा,नरसिंग सूर्यवंशी, मनोज पाटील,बालाजी टाळीकोटे, जाकिर बागवान, अन्वरखा पठाण कृष्णा पिंजरे आदिने पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केली आहे,
