लातूर (दयानंद स्वामी)
लातूर येथील व्ही.एस.पॅथरचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके हे त्यांच्यासह विविध कार्यकर्त्याना घेऊन दि.२ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, लातूर शहरात विविध सामाजिक कामांच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे व्ही.एस.पॅथरचे अध्यक्ष विनोद खटके यांनी प्रथमच राजकीय भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणार असून त्यांच्या समवेत कॉग्रेसचे माजी नगरसेवक सचिन मस्के हे सुद्धा वंचित आघाडीत प्रवेश करणार असल्याने कॉग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.विनोद खटके यांनी विवाह सोहळे, आरोग्य शिबीर अशा विविध सामाजिक कामांतून मोठे संघटन निर्माण केले आहे.
