Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

देवणीत मुस्लिम समाजाच्या वतीने गिरी महाराजांच्या विरोधात निषेध व मूक मोर्चा काढण्यात आला



देवणी प्रतिनिधी 


दोन धर्मीयांमध्ये जाणून बुजून जाती तेढ निर्माण करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने अटक करण्यात यावे यासाठी देवणी शहरात मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने जामा मस्जिद येथून मूक मोर्चास सुरुवात करण्यात आली, हा मोर्चा गांधी चौक मार्गे बोरोळ चौकात येऊन धडकला यावेळी अनेक मुस्लिम समाजातील मौलाना चे भाषणे झाले यावेळी मौलाना हापिज आलामखान  बोलताना सांगितले की आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजाकडून मुस्लिम धर्मीय विरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातीय दंगल घडवण्याच्या इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचे बोलले ,तसेच नितेश राणे हा सुद्धा दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभावा म्हणून जाणून-बुजून चिथावणी खोर भाषणे करीत आहे, मुस्लिम समाजात अनेक ठिकाणी इस्तेमा होतात त्यामध्ये फक्त मुस्लिम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत शिकवन दिली जाते ,पण कोणत्याही धर्म जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले जात नाही, तरी दोन धर्मीयांमध्ये जाणून-बुजून तेढ निर्माण करणाऱ्या रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावे अशा मागण्याचे निवेदन देवणी तहसीलदार यांना देण्यात आले आहे, यावेळी मौलाना हीपजूर रहमान, मौलाना हापिजं आलम  खान, मौलाना हापिज युनूस, मौलाना हाफिज नईम, मौलाना हाफिज इब्राहिम तांबोळी, मौलाना सैफ जमीनदार, मौलाना हाफीज आजिम, मौलाना हाफिज मैनोदिन, मौलाना फैयाज शेख, आयुब कुरशी, फैयाज  शेख, सईद खान, अल्ताफ शेख, सादक कुरेशी, अहमद सय्यद, माजीद तांबोळी, सुलतान मल्लेवाले, जुहेब उंटवाले, सगीर मोमीन, अक्रम शेख, शकील तांबोळी, बाबूलाल पठाण, ताज मुंजेवार, यासीन मुर्शिद यांच्यासह देवणी शहरातील असंख्य मुस्लिम बांधव या निषेध व मूक मोर्चात सहभागी होते,हा मोर्चा शांतेत पार पडला,यावेळी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.