देवणी प्रतीनीधी
देवणी तालुक्यातील युवकाच्या वतीने अत्यंत दुःख व क्रोध मनात धरून कोलकत्ता येथे वैद्यकीय सेवा बजावत असलेल्या एका तरुणीवर अमानुषपणे बलात्कार करून हत्या केलेल्या प्रकरण याच्या निषेधार्थ तहसील कार्यालय देवनी येथील तहसीलदाराच्या मार्फत जिल्हा कलेक्टर लातूर यांना या घटनेच्या निषेधार्थ आरोपीला न्यायव्यवस्थेच्या आधारावर कठोरात कठोर कारवाई व शिक्षा व्हावी यामुळे समाजात होत असलेल्या अशा घटनांना आळा बसावा या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी दीपक मळभागे,पत्रकार भैय्यासाहेब देवणीकर,सचिन कल्याणकर,सिद्धेश्वर मिरचे,सताजी पाटील,ज्ञानेश्वर माचे,सूर्यकांत माचे,हरीओम बन,रवी कोतवाल,अजय सुरवसे,सुमित कांबळे,महादेव कोटे आदी उपस्थित होते.
