देवणी खूर्द येथे रक्षाबंधन निमित्य भावावी भावाला राखी बांधून खरी स्त्री पुरुष समातेची ओळख
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा आणखी घट्ट व्हावा, नात्यातील मायेचे बंध अधिक घट्ट व्हावेत याकरिता हिंदू संस्कृतीप्रमाणे या सणाला अद्वितीय महत्त्व आहे.बहीण-भावाचं नातं दृढ करणारी राखी पौर्णिमा देवणी तालुक्यातील परिसरात घरोघरी उत्साहात साजरी करण्यात आली. बहिणींनी आपल्या भावांना ओवाळून रेशमी धागा बांधला.रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तीन ते चार दिवस बाजारात गर्दी झाली होती. विशेषतः महिलांनी आपल्या भावांसाठी आवडत्या राख्यांची खरेदी केली.सोमवारी सकाळपासून घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. बहिणींनी भावांना ओवाळून गोडधोड खाऊ घातले. श्रावण व रक्षाबंधनामुळे बाजारात फळे आणि पूजा साहित्यांना मागणी वाढली होती. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. शाळा, कॉलेज आणि महाविद्यालयातही विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. काही संघ-संस्थांनीही रक्षाबंधनानिमित्त विविध उपक्रम राबविले.गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात वाढ झाली असली तरी यंदा राख्यांच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याची माहिती व्यापाऱयांनी दिली. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत राखी बांधून भावा-बहिणींनी रक्षाबंधन सण साजरा केला. काही बहिणींनी भावांकडे जात तर काही भावांनी बहिणींकडे जावून राखी बांधून घेतली.पौराणिक कथा भद्रा ही शनी महाराजांची बहीण आहे. शनि महाराजांप्रमाणेच भद्राही उग्र स्वभावाची आहे. भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की, जो तुझ्या भ्रमणकालामध्ये कुठलीही शुभ कार्य करेल त्याला यश मिळणार नाही. पुरणातील उल्लेखानुसार दशानन म्हणजेच रावणाने त्याच्या बहिणीकडून भद्रा या मुहूर्तावरती रक्षाबंधन केल्यामुळे पुढील वर्षभरात त्याला अत्यंत कष्ट भोगावे लागले.अशी मान्यता असून असा उल्लेख पौराणिक कथेत केला आहे.यामुळे असे कुठल्याही प्रकारचे कष्ट आपल्या भावाला भोगावे लागू नयेत. या कारणाने काही ठिकाणी भद्रा चा भ्रमणकाल संपल्यावर शुभमुहूर्तावरच रक्षाबंधन साजरे करण्यात आले @ देवणी खुर्द येथे ग्रामीण विकास महिला संस्थेच्या माध्यमातून विस गावातून निर्धार समातेच्या प्रकल्प चालू आहे तरी देवणी खूर्द येथे एक आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला की भावानी भावाला राखी बाधकी व आत्याला साडी देऊन भेट दिले आहे हे सर्वत्र कौतुक होत आहे,
