उदगीर (एल.पी.उगीले)श्री हावगीस्वामी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी मराठी वाड्.मय मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाचे अध्यक्षस्थानी बी.ए.द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी संध्या किशन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या मंडळात सदस्य म्हणून आरती उकंडे,वैशाली तोटगिरे, कल्याणी मुळे, दिनेश जाधव, सुप्रिया भुजबळे, ऐश्वर्या कांबळे, श्रद्धा नागरगोजे, राजेश्वरी कसबे,अक्षता नरवटे, वैशाली बचेवार, संजीवनी सोनकांबळे, अक्षय दुर्वे, अभिषेक रंगवाळ,निकिता स्वामी, श्रुती मुंगीलवार, मुक्ता कटारे, ओमकार सूर्यवंशी, रवी सूर्यवंशी, अभिषेक रंगवाळ, श्रद्धा मजगे व सोनाली गायकवाड इत्यादीची निवड करण्यात आली. या मंडळाच्या वतीने
भीतीपत्रकाचे विमोचन, मराठी भाषा पंधरवडा निमित्त कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सृर्जनशीलतेला व व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने सदरील मंडळाची निर्मिती दरवर्षी करण्यात आली.
मराठी वाड्.मय मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सदस्य, प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर, उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, विभागप्रमुख डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ.म.ई.तंगावार, डॉ.वर्षा निरगुडे, डॉ.के.के.मुळे, प्रा.राजा कांबळे, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले.
