Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद नगरात मनसे शाखेची स्थापना




उदगीर (एल.पी.उगीले):- आगामी विधानसभा निवडणुकाच्या दृष्टीने मनसे तयारीला लागली असुन त्याच अनुषंगाने स्वामी विवेकानंद नगर,नाईक चौक, उदगीर येथे मोठ्या उत्साहात शाखेचे उद्घाटन करण्यात आले.  राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन जनतेच्या आडी अडचणी सोडविण्या साठी तसेच परीसराच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या या परिसरातील तरुणांनी मनसेची शाखा काढून महाराष्ट्राच्या नवनिर्माणाच्या चळवळीत आपले योगदान देण्याचा निश्चय केला. शाखेचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शाखेचे पदाधिकारी महाराष्ट्र सैनिकांनी जन सामान्यांसाठी सातत्याने कार्यरत राहुन मदत करावी, उदगीर विधानसभेतील पक्ष संघटना त्यांच्या मागे खंबीर उभी राहील. असा विश्वास दिला.याप्रसंगी शाखाध्यक्ष केदार पुराणिक, उपाध्यक्ष आदर्श भोसले,सचिव प्रथमेश बिरादार, सह सचिव आदित्य पाटील, कोषाध्यक्ष शिवानंद मोरे,सह कोषाध्यक्ष आदित्य कोनाडे, संघटक शरद पुल्ले, सह संघटक अभिजीत मरखेले, सदस्य विजय माने, महेन्द्र खटके, अजिंक्य बुरले, अभिजीत पाटील, आदित्य गुरमे, आर्यन गुरमे,कुमार कनाडे, भिमाशंकर कनाडे, प्रदीप शिंदे, सुमित होळकर, अभिषेक सुमारे आदी शाखा पदाधिकारीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष संतोष भोपळे, शहर सचिव अँड.लखन पुरी इ.पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.