उदगीर (एल.पी.उगीले)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांच्या सूचनेवरून सुनिता तेलंगे यांची उदगीर शहर कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र क्रिडा, युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्षा दिपाली औटे यांच्या हस्ते देण्यात आले. सदरील निवड युवती जिल्हाध्यक्षा साक्षी कांबळे यांनी केली. सदरील निवडीस शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर जिल्हाध्यक्ष अभिजीत औटे यांनी केली. या निवडीबद्दल आ. बाबासाहेब पाटील, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्हाध्यक्ष अफसर शेख, कार्याध्यक्ष पंडित धुमाळ, प्रदेश सरचिटणीस व्यंकट बेद्रे, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश उपाध्यक्ष खाजा तांबोळी, जिल्ह्यध्यक्ष शफि हाशमी, सामाजीक न्याय जिल्हाध्यक्ष प्रदिप जोंधळे, उदगीर तालुका अध्यक्ष बालाजी भोसले, शहर अध्यक्ष जानी सय्यद, वसंत पाटील, शशिकांत बनसोडे, युवती शहराध्यक्ष काजल मिरजगावे, महिला तालुका अध्यक्ष उर्मिला वाघमारे, शहर अध्यक्ष मधुमती कनशेट्टे, कार्याध्यक्षा वैशाली कांबळे, शहर उपाध्यक्ष प्रिती कवठीकवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे सर्व पदाधिकाऱ्यानी अभिनंदन केले आहे.
