Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उदगीरच्या बुध्द विहारच्या घुमटाचे रंगकाम करताना एकजण पडून जखमी नाकाचे, हाताचे आणि पायाचे हाड तुटले, तर अंगठा फ्रॅक्चर, गुत्तेदार बी.आर.आंन्दे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल..



उदगीर : प्रतिनिधी

उदगीर शहरात लोकार्पण सोहळ्यासाठी महामाहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू येत असलेल्या बुध्द विहार च्या घुमटाचे रंगकाम करताना रंगकर्मी घुमटावरुन खाली पडल्याने नाकाचे, हाताचे आणि पायाचे हाड तुटले, तर अंगठा फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला. याप्रकरणी बुधवारी (२८ ऑगस्ट) उदगीर शहर पोलीस ठाण्यात संबंधित गुत्तेदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


    याबाबत अधिक माहिती अशी की, दि.४ जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास शहरातील बुध्द विहार येथे गुत्तेदार बी. आर. आंदे यांचे निष्काळजीपणे रंगकाम करून घेताना कोणतेही सुरक्षा व्यवस्था न पूरवल्याने फिर्यादी सलुबाई संजय चव्हाण यांचा मुलगा नामे सोनू उर्फ अभिषेक उंचावरून खाली पडून गंभीर दुखापत होवून त्याचे डाव्या पायाचे हाड तुटले  व नाकाचे हाड तुटले तसेच  उजव्या हाताचा अंगठा फॅक्चर झाला. त्याला तातडीने पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी सुलूबाइ सजंय चव्हाण (रा.काशीराम तांडा, नागलगाव ता.उदगीर) यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.२२९/२०२४ कलम १२५(ब) भारतीय न्याय सहिंता नुसार गुत्तेदार बी.आर.आंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत.

राष्ट्रपती महोदयाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला अशा पद्धतीची घटना घडल्यामुळे शहरात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.