Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सामाजिक जाण निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबिराची गरज - फ्रान्सिस




उदगीर (प्रतिनिधी) 

सध्या समाजामध्ये माणसां माणसामध्ये प्रेम निर्माण व्हावे, कारण ईश्वराने प्रेमाचाच संदेश दिलेला आहे. ही जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी रक्तदान शिबिर अत्यंत गरजेचे आहे. असे विचार गोल्ड मिशन चर्च ऑफ गॉड चे अध्यक्ष मिशनरी फ्रान्सिस यांनी व्यक्त केले.

 ते उदगीर शहरातील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. 

याप्रसंगी वर्ड मिशन चर्च ऑफ गॉड उदगीर शाखा यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून एफ. पी.ए. संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, डॉ. अशोक नागोरे, डॉ.राजेश्‍वर शेट्टी, डॉ. मल्लांना पाटील, श्रीनिवास बिराजदार, बिदर येथील संस्थेचे जिंदोल कॅनडी, येसुदास कामपे, उदगीर संस्थेचे दिपाली कोंगे, संदेश कोंगे, सुनील म्हेत्रे, गवळण म्हेत्रे, बालिका कांबळे, वीरभद्र जाधव, सुनीता भातंब्रेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना फ्रान्सिस म्हणाले की, गोल्ड मिशन चर्च ऑफ गॉड संस्थेच्या वतीने जगातील 175 देशांमध्ये समाजसेवेचे कार्य केले जात आहे. यामध्ये युवक आघाडी आहे, विद्यार्थी संघटन ही मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या साठ वर्षापासून समाजातील गरजू, उपेक्षित, गोरगरीब यांना मदतीचा हात देण्याचे काम या संघटनेच्या मार्फत केले जात आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे. विज्ञानाने सर्व काही बदलले असले तरी रक्त अद्याप बनवता आले नाही. अपघात घडला तर रक्ताची अत्यंत गरज असते. ती गरज भागवण्यासाठी रक्तदान शिबिर वेळोवेळी घेतली जावीत, आपल्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. या सदभावनेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. माणसाच्या मनामध्ये मातृशक्ती निर्माण व्हावी. इतराबद्दल प्रेमभाव निर्माण व्हावे .आई ज्या पद्धतीने मुलावर प्रेम करते, त्याच पद्धतीने आपण समाजातील प्रत्येकावर प्रेम करावे. एकमेकांना सहाय्य करून एकमेकांची प्रगती करण्यामध्ये हातभार लावावा. समाजामध्ये जे पीडित आहेत, दुर्बल आहेत, त्यांना आर्थिक सहकार्य करावे, जे विकलांग आहेत किंवा शारीरिक कमजोर आहेत त्यांना त्या त्या पद्धतीने मदत करून त्यांची गरज भागवावी. अशा हेतूने ही संस्था काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. उदगीर शहरासोबतच कमालनगर, भालकी यांनी बिदर या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचे उपक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उदगीर शाखेच्या दिपाली कोंगे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.