Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कानेगाव येथे जयंतीनिमित्त साहित्यरत्न डॉ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात मिरवणुक उत्साहात अण्णाभाऊंचा विचार घराघरात पोहोचवा -- आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर




 देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे


 शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथे  साहित्यसम्राट डॉ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०४ व्या जयंतीचा ध्वजारोहण डॉ संजय बंडले यांच्या शुभहस्ते करण्यात आले, जन सन्मान पदयात्रा निमित्त आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर  साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस यांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले, भैय्या बोलताना म्हणाले मातंग समाजात असलेले अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे तरच आपण आपल्या विद्यार्थ्यांना घडू शकतो अन्यथा विद्यार्थी शाळेपासून  वंचित राहू नये कारण आज आपल्या समाजाची दुरवस्था झालेली आहे हे जर आपल्या डोक्यातून काढायचा असेल तर आपला विद्यार्थी विद्यार्थिनी शिकले पाहिजे अण्णाभाऊंचा इतिहास फार मोठा आहे आज जयंतीच्या माध्यमातून समजणार नाही ते विचार करण्यासाठी आपली ताकद निर्माण झाली पाहिजे हे फक्त विद्यार्थी करू शकतात म्हणून विद्यार्थी शिकवा हे जयंतीचे सार्थक झालं असे वाटेल, जे काही निधी लागेल ते मी द्यायला तयार आहे लाडकी बहीणीची योजना ही बहिणीला भेटली आहे तर मला बहिणीचा मला आशीर्वाद द्या अशी बोलताना व्यक्त केले, कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार संभाजीभैया पाटील निलंगेकर,माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,अरविंदभैय्या पाटील निलगेकर,गोविंदराव चिलकुरे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती जिल्हा परिषद लातूर, संजय दोरवे, प्रशांत पाटील जवळेकर, शाहूराज शिंदे लहुजी शक्ती सेना शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष, हवालदार कांबळे माजी सैनिक, शंकर पाटील पोलीस उपनिरीक्षक देवणी, अभिजीत डोईजवाड पोलीस, गजानन गायकवाड मानवी हक्क अभियान देवणी तालुका अध्यक्ष, रवी मोतीरावे लहुजीशक्ती सेना उपाध्यक्ष देवणी,आशा सुपरवायझर रेखा लांडगे,पञकार लक्ष्मण रणदिवे,

सामाजिक कार्यकर्ते, यासह साहित्य सम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यवर प्रकाश टाकले, तसेच जयंती समितीच्या वतीने सर्वाचा सत्कार करण्यात आले,जयंती समितीचे अध्यक्ष कोडिराम लांडगे, उपाध्यक्ष लक्ष्मण लांडगे, सचिव अनिल लांडगे, मनोहर लांडगे मार्गदर्शक, मिरवणूक उद्घाटक ब्रह्मानंद शिवनगे सरपंच यांच्या शुभहस्ते करण्यात आले,तसेच ग्यानोबा लांडगे, मल्लिकार्जुन लांडगे, भानुदास लांडगे, वसंत लांडगे, अरविंद गवारे, कल्याण लांडगे, भानुदास गवारे, तातेराव लांडगे, साधू लांडगे, वाघ अंबर लांडगे, बाबुराव लांडगे, कचरू लांडगे, दत्तू लांडगे, सर्व कमिटीचे पदाधिकारी,गावातील प्रतिष्ठित नागरिक,माजी लाडकी बहिणीचा सन्मानपत्र, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, बचत गटांचा सत्कार, अंगणवाडी ताईंचा सत्कार उत्कृष्ट काम केलेचा सत्कार, यावेळी करण्यात आले,महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.