Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जळकोटच्या भुमीअभिलेख कार्यालयात नागरिकांना नाहक त्रास !



अतनूर / प्रतिनिधी

जळकोट येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा अनागोंदी कारभार सुरु असून, येथे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्या नागरिकांना त्रास दिला जात असल्याचे आढळून येत आहे. शासकीय पगार असतानाही, लोकांची कामे पैसे दिल्या शिवाय काम होत नसल्याचे आढळून येतं आहे.

याबाबतीत अतनूर येथील अल्पभूधारक शेतमजूर शेतकरी तुकाराम काशिनाथ सोमुसे-पाटील यांनी जिल्हा अधीक्षक लातूर यांना एका शेती मोजणी विषयावर निवेदनात तक्रारी केली आहे की, जमिनीची मोजणी करूनही त्याचा प्रस्ताव लातूर येथे पाठविण्यास टाळाटाळ करीत असल्याबाबत.

संदर्भ- मा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख लातूर यांचेकडील पत्र क्रमांक.आस्था-२/अपील/एस.आर.३२/२०२३.दि.३१ जुलै २०२३ अन्वये उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये विनंतीपूर्वक अर्ज करतो की, मी तुकाराम काशिनाथ सोमुसे रा.अतनूर ता.जळकोट जि.लातूर येथील रहिवासी आहे. मौजे अतनूर ता.जळकोट येथील सर्वे नंबर १७ गट नंबर १९ ची जमीन मोजणी तातडीची फीस दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी भरून भूमी अभिलेख कार्यालय जळकोट येथे संपूर्ण कागदपत्रासह प्रस्ताव देण्यात आला. ४ महिन्यानंतर दि.२७ मार्च २०२४ रोजी गटाची मोजणी करण्यात आली. मोजणी करून ६ महिने पूर्ण होत आहेत. जळकोट येथील कार्यालयात वारंवार भेटी देऊन मोजणीचा प्रस्ताव लातूर येथे पाठविण्याची विनंती करण्यात आली. परंतु आजपर्यंत जळकोट भूमि अभिलेख यांच्याकडून प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही. प्रस्ताव पाठविण्यास जाणून बुजून टाळाटाळ करण्यात येत आहे. तेव्हा विनंती की प्रस्ताव पाठविण्यास विलंबाची चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करावी ही विनंती. तुकाराम काशिनाथ सोमुसे रा.अतनूर ता. जळकोट जिल्हा लातूर यांनी केली आहे. असे असतानाही आजपावेतो कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही. सर्वसामान्यांना या कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळत नाही. मात्र चौकशी करण्यासाठी जानाऱ्यांचा काहीच न सांगता अपमानित केल्या जाते. जळकोट व उदगीर च्या उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतं आहे. सदरील कार्यालयात असलेल्या लिपिका कडे आखिव पत्रिका तयार करून देण्याचे महत्त्वाचे टेबल असल्याने ते देण्यासाठी उघडपणे पैश्याची मागणी करीत आहेत. पैसै दिले तर त्वरित काम करुन देण्यात येते. न दिल्यास आठ ते दहा दिवसांनी या असे सांगून नाहक त्रास दिल्या जात आहेत. उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्वात बेजबाबदार कार्यालय म्हणून आज उदगीर व जळकोट येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाहिले जात आहे. या कार्यालयात ज्याची ओळख, त्याचे काम पहिले केले जाते आणि सर्व सामान्यांना फक्त चकरा वर चकरा माराव्या लागतात. शेतजमीन, न्यायालयीन मोजणी कामे, पाणंद रस्ते, जायमोकयावरील जागेची, गुंठेवारी, प्लॉट मोजणी व्हावी म्हणून कित्येक जणांनी एक वर्षांपासून ते सहा-सहा महिने अगोदर पैसे भरून ठेवले आहेत, मात्र त्यांची आजही मोजणी होत नाही. परंतु काही जण दोन दिवस अगोदर पैसे भरतात, लगेच मोजणीची नोटीसी काढलीं जाते. मग सर्वसामान्याना सहा-सहा महिने फेऱ्या का माराव्या लागतात? या कार्यालयातून टोच नकाशा, ९\३, ९/४, असे विविध नकला देताना पैसेची मागणी करत असतात न दिल्यास या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने पुणे व  छत्रपती संभाजीनगर व लातूर च्या वरीष्ठ अधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ग्राहक संरक्षण परिषद शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर सह सर्व सामान्य जनतेतून बोलल्या जात आहे.

याबाबतीत जळकोट उपाधीक्षक भूमी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक एम.जी.घोटाळे यांच्याशी संपर्क केला असता तुकाराम काशिनाथ सोमुसे रा.अतनूर शेतकरी या संबंधितांची मोजणी करण्यात आलेली आहे हे मला आठवत नाही, असून पुढील कारवाईस पाठविले की नाही. याबाबतीत मी.ऑफिसमध्ये जाऊन पाहिल्याशिवाय आपणास कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ शकत नाही. तसेच आज तक्रार अर्ज पाहणी करण्यास माझ्याकडे वेळ नसून मला छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) कार्यालयातील कामाचा व्याप माझ्या पाठीशी असल्याचे घोटाळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.