उदगीर (एल.पी.उगीले) येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित मातृभूमी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यवीरा बद्दल कृतज्ञता व अभिवादन म्हणून मागील पंधरा वर्षापासून रक्तदान शिबिर घेतले जाते.यावेळी या शिबिराचे उद्घाटन मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. यावेळी सुधीर पाटील, संजय राठोड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बिभीषण मद्देवाड, प्रा रणजीत मोरे, प्रा. उस्ताद शेख , संतोष जोशी ,रेखा रणक्षेत्रे, जगदिशा ओंकारे आदीची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरात बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित कस्तुराबाई नरसिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल,मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेत शिबीर यशस्वी केले.
