उदगीर (एल.पी.उगीले)
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रालय महाराष्ट्र राज्य आ.बच्चुभाऊ कडू यांच्या कार्याने प्रेरित होऊन तोगरी येथील तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. तोगरी येथील प्रशांत माधवराव गंगण्णा, मनोज मल्लिकार्जुन महादा,सतीश उमाकांत भताटे या प्रमुख युवा कर्यकर्त्यांच्या सोबतच नव्याने राजकारणात येऊ इच्छित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश घेतला केला आहे. या तरुणांना त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे योग्य ते पदे देण्याचा निर्णय घेऊन प्रशांत गंगण्णा यांची ग्रामीण तालुका उपाध्यक्ष पदी तर मनोज मल्लिकार्जुन महादा यांची-तालुका सरचिटणीस पदी आणि तसेच सतीश उमाकांत भताटे यांची तोगरी पंचायत समिती सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आले.
यावेळी प्रहार तालुका संघटक सोपान राजे, तालुका चिटणीस बळीराम चौधरी, शहर संपर्क प्रमुख अमित खंदारे, शहराध्यक्ष महादेव मोतीपवळे, संदीप भीमसेन पाटील,संगमेश्वर बसवराज महादा, गंगाधर उमाकांत संग्रामपटले,विद्यार्थी शहर प्रमुख मंगेश येरकुंडे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
