देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी: येथील लासोना चौकात मंगळवारी (दि.६) दुपारी व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया व लातूर जिल्हा अध्यक्ष संगम कोटलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांसबत संवाद बैठक संपन्न झाली.
या बैठकीमध्ये दिनांक ३१ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पत्रकार अधिवेशना संदर्भात चर्चा करण्यात आली.
तर यावेळी पत्रकारांच्या आरोग्य विषयी आरोग्य कार्ड देणे, आरोग्य संरक्षण कवच करिता ४९९मध्ये एक वर्षाची विमा काढणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे तसेच खाजगी क्षेत्रात शिकवणी करिता फी मध्ये सवलत मिळवून देणे आदी विषयासह पत्रकारांच्या विविध मागण्यांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी देवणी तालुक्यातील पत्रकार महेश कणजे, जाकीर बागवान, बालाजी कवठाळे, शकील मणियार, प्रमोद लासोने, गिरीधर गायकवाड, आनंद अंकुलगे, हसन शेख , नरसिंग सूर्यवंशी, राहुल बालूरे, लक्ष्मण रणदिवे, कृष्णा पिंजरे, सचिन मंगनाळे आदींसह इतर तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. रेवण मळभगे यांनी मांडले.
