Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिर्ला ओपन माईंडस् इंटरनॅशनल स्कूल उदगीर मध्ये वृक्ष लागवडी संगोपनाचा संकल्प करीत ‘ग्रीन डे’ साजरा




 उदगीर :-     विद्यार्थ्यांना नैसर्गिक संसाधनांचे मूल्य समजावे आणि हिरव्या रंगाशी त्यांचा परिचय व्हावा यासाठी उदगीर शहरातील  "बिर्ला ओपन माईंडस्  इंटरनॅशनल स्कूल उदगीर" येथे मोठ्या उत्साहाने “ग्रीन डे (हरित दिन)" साजरा करण्यात आला. 

       या दिनानिमित्त शाळेत “ग्रीन(हिरवी) वेशभूषा” परिधान करून आलेले सर्व विद्यार्थी आणि शिक्षक पर्यावरणपूरक दिसत होते.  शाळेचा परिसर आणि वर्ग खोल्या हे हिरवे चलचित्रे, फुगे व वस्तू इत्यादींच्या मदतीने ग्रीन(हिरव्या) थीममध्ये सुंदर सजावट केली गेली होती. या वेळी विविध प्रकारची चित्रे, फळे व फुले असे सजावटीचे साहित्य विद्यार्थ्यांनी तयार करून आणले होते. प्री-प्रायमरी च्या विद्यार्थ्यानी या दिनानिमित्त आंबा, पेरू, नारळ, झाडे, इत्यादींची वेशभूषा केलेली होती आणि त्या वरती बडबडगीते(ॲक्शन सॉंग) ही सादर केली तसेच त्यांनी आपल्याला या  निसर्गातून मिळणार्‍या फुल, फळ, भाज्यांचे महत्व ही सांगितले.


पर्यावरणाचा बिघडलेला समतोल व वाढते तापमान यावर वृक्ष लागवड हाच एक पर्याय आहे. हे लक्षात घेवून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना झाडे तसेच पर्यावरणाची ओळख व्हावी, यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रा. आनंद जोशी तसेच प्रमुख आकर्षण म्हणून पर्यावरणस्नेही कारवा ग्रुपचे अध्यक्ष ॲड. अदिती पाटील, ओमकार गांजुरे, गुरुप्रसाद पांढरे, अनंत कांते इ. सदस्य उपस्थित होते.


पर्यावरणाला मदत व्हावी आणि पावसाळ्यात जमिनीत फळ झाडाची लागवड व्हावी म्हणून कारवा ग्रुप मार्फत सीड बॉल तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. संपूर्ण पावसाळ्यात या सीडबॉलमधील बियांची रुजवणूक झाली, की छोटी-छोटी रोपे उगवतात. अशा पद्धतीने सीडबॉलच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धन होते, अशी माहिती यावेळी या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आली.

संस्थचे अध्यक्ष बापूराव राठोड, संस्थेचे सचिव मा. अमित राठोड यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी सभापती बापूराव राठोड यांनी " वृक्षारोपण  आणि संवर्धन हि काळाची गरज आहे" असा संदेश दिला तर संस्थेचे सचिव अमित राठोड यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे यासाठी सामूहिक वृक्षप्रतिज्ञा घेतली.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती भांगे व राहेल अँथोनी  यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक  नकुरे  यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.