देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी : देवणी शहरात भारत जोडो मित्र मंडळाच्या वतीने एकाच मंडपात एका बाजूला गणेश मूर्तीची स्थापना व दुसऱ्या बाजूला पिराची स्थापना केली जात असते हिंदू व मुस्लिम बांधव या दोन्ही देव देवताची पूजा मनोभावे करतात त्यामुळे शहरात सामाजिक समता प्रस्थापित झाली आहे त्यामुळे शहराला संस्कृतीक सामाजिक समतेचा वारसा असून प्रत्येक समाजाचे कार्यक्रम सर्वधर्म समाजाचे लोक एकत्र येऊन करीत असतात त्यामुळे या कोणत्याही कार्यक्रमात अनुचित प्रकार घडल्याचा इतिहास नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही देवणी शहर हे सामाजिक समता प्रस्तापित करणारे शहर असल्याचे प्रतिपादन देवणीचे पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी गणेश उत्सव व ईद ए मिलाद सनानिमित्य आयोजित शांतता बैठकीत केले,माणिकराव डोके पुढे म्हणाले की गणेश विसर्जनाच्या वेळी अतिउत्सiही कार्यकर्ते असतात त्यामुळे वादविवाद होण्याची शक्यता असते त्यामुळे नियमानुसार त्याच्यावर कार्यवाई करावी लागते असे सांगून या अकरा दिवसाच्या कालावधीत नगरपंचायत,महसूल विभाग, महावितरण विभाग पंचायत कर्मचारी आपल्या सोबत आहेत त्यामुळे कोणतीही अडचण होणार नाही वेळोवेळी होणाऱ्या अडचणी प्रशासनाच्या लक्षात आणून द्याव्या त्यामुळे प्रशासनावर उपाय योजना करता येतील विसर्जनाच्या ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवणी तहसीलचे नायब तहसीलदार व्हीआर पाटील तर मार्गदर्शक म्हणून तहसीलदार सोमनाथ माळी उपस्थित होते गणेश उत्सवा संबंधित शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचना गणेश भक्तांना दिल्या हे दोन्ही उत्सव चांगल्या प्रकारे साजरे करा प्रशासन आपल्या सोबत असल्याचेही तहसीलदार सोमनाथ वाडकर, यांनी सांगितले या प्रसंगी गणेश मंडळ पदाधिकारी अध्यक्ष, पोलीस पाटिल,सरंपच,जेष्ठ मंडळी, पञकार बांधव,सर्वच पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते महसूल, नगर पंचायत समिती व महावितरण विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते यावेळी प्रा.अनिल इंगोले,पञकार बालाजी टाळकोटे, औदुंबर पांचाळ, पञकार रमेश कोतवाल, सतीश पाटे सर इत्यादीने मार्गदर्शक सूचना केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत मोठेराव यांनी केले शांतता बैठकीचे आयोजन पोलीस स्टेशन कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आले
