उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नसल्यामुळे पिक विमा मिळावा म्हणून वेळोवेळी मागणी करूनही शेतकऱ्यांच्या आणि गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन च्या पदरी निराशा आली होती. शेवटी चेअरमन संघटनेच्या वतीने उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनात्मक पवित्रा घेऊन पिक विमा सत्याग्रह करण्यात आला. 2023 साली चा खरीप हंगामातील सोयाबीन आणि तूर पिकासाठी कंपनीने 100% पीक विमा उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला पाहिजे. ही आग्रही मागणी घेऊन चेअरमन संघटनेने आंदोलन केले आहे. तसेच महसूल विभागाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना मिळणारे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीन अर्थसाह्य अनुदानासाठी ईपीक पाहणी ही जाचकट रद्द करणे, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप 2023 चा पिक विमा देणे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांसाठी असलेल्या जाचक अटी रद्द करणे, शासकीय योजना मंजुरीसाठी दलाल शासकीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात वावरत आहेत ते बंद करणे. या मागण्यासाठी अहिंसक मार्गाने पीक विमा सत्याग्रह आंदोलन करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ चेअरमन कोंडीराम काळोजी मोघा, हेरचे चेअरमन संगमेश्वर मिटकरी, शिवाजी पाटील तोंडचिर, बसवराज पाटील उदगीर, मनमत कोणमारे कौलखेड, अशोकराव आबा माने हळी, शिवा पाटील चिगळी, अण्णाराव गंभीरे करवंदी, श्रीरंग कुंडगीर कल्लूर, विठ्ठलराव मुळे सुकनी, धोंडीबा डावळे डावूळ ,वैजनाथ केसगिरे उमरगा, व्यंकट कुंडगीर खेरडा, ज्ञानेश्वर भांगे वाढवणा, रामराव पाटील देऊळवाडी, किशन मोरे शेल्हाळ, रामराव पाटील करखेली, रमेश बंडे दावणगाव, संतोष सोमासे वाढवणा, व्यंकट बिरादार बेलसकरका, दयानंद रोडगे देवर्जन, विवेक जाधव गंगापूर भाकसखेडा इत्यादी चेअरमन चा सहभाग होता.
या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, प्रहार जनशक्ती पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड या संघटनेने पाठिंबा दिला. या संघटनेच्या नेत्यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने माजी आ. मनोहर पटवारी, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी नगराध्यक्ष उषाताई कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजी मुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, रंगा राचुरे, श्रीकांत पाटील, दत्ता सुरनर, बाळासाहेब पाटोदे, अमित खंदारे, प्रकाश रोडगे, अजित शिंदे, आशिष पाटील राजूरकर, विनोद तेलंगे, रविकिरण बेळकुंदे, ओंकार गांजुरे भालेराव जाधव यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.
