उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य असून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो त्यामुळे ही जागा 2024 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच लढविणार असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा लातूर जिल्हा अध्यक्ष श्री अमोल निडवदे यांनी सांगितले
1999 पासून ते 2019 पर्यंत 5 विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये 3 वेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून गेले आणि 2 वेळेस भारतीय जनता पक्षाचा उमेदवार खूप कमी मतांनी पराभूत झाला असे चित्र आहे 2004 ला तर अतिशय 3000 सारख्या फरकाने निसटता पराभव भाजपचा झाला...या सगळ्या आकडेवारी वरून सिद्ध होते की उदगीर विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि ही जागा भारतीय जनता पक्षानेच लढवावी अशी सर्व युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे...
उदगीर विधानसभेसाठी भाजप कडून अनेक जण इच्छुक आहेत त्यात प्रामुख्याने भाजपा ज्येष्ठ नेते पंडित सूर्यवंशी,प्रदेश सचिव बालाजी गवारे, ज्यांनी अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळविली असे युवा नेतृत्व श्री विश्वजित गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड यांच्यासह युवा मोर्चाचे जिल्हा सचिव श्री साधूराम कांबळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री प्रसाद नाईकवाडे हे सुद्धा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत...उदगीर विधानसभे मध्ये उदगीर आणि जळकोट तालुका मध्ये भारतीय जनता पक्ष वाढविन्यासाठी अनेक कार्यकर्त्याने योगदान दिले, वाडी तांड्या पर्यंत, तळागाळापर्यंत पक्ष नेला त्यांची ही मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही, ही जागा भाजपच लढवेल असा विश्वास आहे...
