देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपलीलेखनी शोषित वर्गाच्या न्यायासाठी व शोषण मुक्तीसाठी आयुष्यभर तेवत ठेवली आणि वास्तववादी साहित्य निर्माण केले असे विचार प्रा व्यंकट सूर्यवंशी यांनी व्यक्त केले मोजे टाकळी वलांडी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या लोकनियुक्त सरपंच अंजनाबाई बीबीनवरे या होत्या तसेच व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ व्यंकट सूर्यवंशी , प्रा संजय बिबीनवरे,ग्रामसेवक पताळे, बीट अंमलदार लामतुरे , पत्रकार लक्ष्मण रणदिवे जयंती समितीचे अध्यक्ष श्रीनिवास बीबिनवरे,उपाध्यक्ष जय हिंद बिबिनवरे, वसत बिबिनवरे उपेक्षाताचे नेते,माधव सूर्यवंशी शिवाजी बीबीनवरे,श्री केशव कांबळे, धीरज कांबळे, अडवोकेट पुरुषोत्तम कांबळे,सूर्या सुरेश बीबीनवरे,शंकर बीबीनवरे, अरूणा बेळमंपुरे,रमाताई कांबळे अंगणवाडी सेविका,सुनिता बिबिनवरे अशा कार्यकर्ते, रंजना बिबिनवरे,अशाबाई गायकवाड मदतनिस, पाणीपुरवठा सेवक उमाकांत हिप्परगे,गोपीनाथ कांबळे, रमेश बीबीनवरे,आदि उपस्थित होते पुढे बोलताना प्रा व्यंकट सूर्यवंशी म्हणाले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाजाच्या शोषण मुक्तीसाठी आपल्या साहित्याच्या माध्यमातून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला अण्णाभाऊ चे साहित्य हे परिवर्तनाला दिशादर्शक असून गरीब ,शोषित ,कामगार ,कष्टकऱ्यांचा आवाज आपल्या लेखणीतून दाखवून दिला असे विचार व्यक्त केले प्रा, संजय बिबीनवरे म्हणाले की ,लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपली मोलाची भूमिका बजावत स्वातंत्र्यासाठी लोकांच्या मनामध्ये जनजागरणाचे कार्य अविरतपणे केले त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राचे निर्मितीमध्ये सुद्धा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे . आपल्या मातीवर आणि माणसावर किती प्रेम करावे हे अण्णाभाऊंनी त्यांच्या विचारातून दर्शविले आणि म्हणूनच अण्णाभाऊ म्हणत असत मला माणसं खूप आवडतात असे विचार व्यक्त केले,ध्वजारोहण सोसायटीचे व्हा चेअरमन गंगाधर गुडसुरे यांच्या हस्ते करण्यात आले जयंती उत्सव समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले अण्णाभाऊ च्या जीवनावर आधारित भाषण स्पर्धा ठेवण्यात आली त्यात प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात आले विद्यार्थी हे पुढील काळातील भविष्य असल्यामुळे सामाजिक दृष्टिकोन पुढे ठेवून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंती समितीचे सर्व पदाधिकारी व गावातील पुरुष महिला प्रेरक प्रेरिका उपस्थित होते, मुख्य आधारस्तंभ उपेक्षित लोक कलावंत निराधार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष वसंत बीबिनवरे यांची नियोजन,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बिबीनवरे यांनी केले,
