Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हिसामनगर येथे वीज पडून शेतमजुराचा मृत्यू ; दोघे जखमी




देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे


देवणी : तालुक्यातील हिसामनगर माटेगडी येथे बुधवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी दुपारी ०४ वाजता अचानक झालेल्या पावसात वीज पडून संदीप केशव वाघमारे वय ३६ या शेतमजूराचा मृत्यू झाला ; तर दोघे जखमी आहेत. जखमी पैकी दत्तू माधव येदले अत्यवस्थ असून उदगीर येथे त्यांच्या उपचार चालू आहेत. मयत संदीप वाघमारे यांच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार असून या आकस्मिक निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे,माजी सरपंच विजयकुमार मुक्के,पोलीस पाटील विलास सावंत, मंडळ अधिकारी  बालाजी केंद्रे, तलाठी अतिश बनसोडे आदींनी घटनास्थळी भेट देत पंचनामा करून  प्रेत उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनासाठी वलांडी येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले असल्याचे कळते,मयताचे चुलत भाऊ कुमार पंढरी वाघमारे यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम १९४ अंतर्गत, गुन्हा क्रमांक २७/२०२४ ने अंमलदार  मुळे ( HC/११४३) यांच्याकडे सदरील मयताची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास अंमलदार किवंडे (NPC/१३२) करत आहेत.असे देवणी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक माणिक डोके 

यांनी कळवले आहे.सदरील दुर्घटना हिसामनगर  शिवारात कल्याणराव शिवप्पा मिरकले यांच्या शेतात घडली आहे, या दु:खात देवणी तालुक्यातील मातंग बाधव सहभागी आहे,देवणी तालुक्यातील मानवीक्ष हक्क अभियान सघटनेच्या वतीनेही कुटुब दु:खात लवकर सुधारावे व शासनाकडे आर्थीक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.