देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
कै. रसिका महाविद्यालयातील विद्यार्थी कांबळे इंद्रजीत बीएससी तृतीय वर्ष याची लातूर जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे लातूर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पुणे येथे आयोजित स्पर्धेत लातूर जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या विद्यार्थ्यास प्रा. डॉ. सचिन चामले शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कांबळे इंद्रजीत याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्था अध्यक्ष मा.श्री. गोविंदरावजी भोपणीकर साहेब, संस्था सचिव मा.श्री. गजाननजी भोपणीकर साहेब, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे सर,उप-प्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के यांनी खेळाडूचे अभिनंदन केले आहे.तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी,मानवी हक्क अभियानाचे लातूर जिल्ह्याचे संघटक लक्ष्मण रणदिवे,देवणी तालुकाध्यक्ष गजानन गायकवाड, रवी मोतीरावे, डी एन कांबळे,यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
