उदगीर एल पी उगिले
येथील सुप्रसिद्ध इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचा माजी विद्यार्थी दिपक दत्ता पाटील हा एम.बी. बी. एस प्रवेशासाठी असलेल्या नीट परीक्षेत 720 पैकी 675 गुण घेऊन घवघवीत यश मिळविल्याबद्दल क्लासेसच्या वतीने त्याचा पालक दत्तात्रय पाटील हाळणीकर यांच्यासह सत्कार करण्यात आला. दिपक पाटील हा शालेय जीवनापासून अतिशय हुशार व सर्वगुणसंपन्न विद्यार्थी आहे, तो इयत्ता नववी मध्ये असताना तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम आला होता, तर निबंध स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता, त्याच बरोबर दहावी बोर्ड परीक्षेत त्यांने गणितात 100 पैकी 100 तर एकूण 97% गुण प्राप्त केले होते.अशीच मेहनत तो कायम ठेवल्यामुळे नीट परीक्षेत 675 गुण घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश पात्र ठरला आहे. त्याच्या या घवघवीत यशाबद्दल इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसचे संचालक प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी दिपकचा व दिपकचे आदर्श पालक दत्ता पाटील यांचा शाल व गुलदस्ता देऊन व पेढा भरवून सत्कार केला.
