उदगीर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी अभिवादन केले.
यावेळी ना.बनसोडे यांनी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान आहे ज्यांनी वंचितांच्या व्यथा आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडल्या अशा लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतीदिन असुन त्यांच्या कार्याला नमन करतो असे सांगितले.
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, बन्सीलाल कांबळे, जवाहरलाल कांबळे, प्रा.बिभीषण मद्देवाड, प्रा.शिवाजीराव देवनाळे, प्रा.पंडित सुर्यवंशी, प्रल्हाद येवरीकर, राम कांबळे, कुणाल बागबंदे, राजकुमार चव्हाण, अजित कांबळे, रविंद्र बेंद्रे, रणदिवे, पप्पु गायकवाड, रामेश्वर शिंदे, रऊफ थोडगे, जितेंद्र शिंदे, आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
