Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रामाणिकपणे कष्ट केल्यास यश मिळतेच : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे साहित्य संमेलनाच्या माध्यामातुन उदगीरचे नाव जगामध्ये गेले




उदगीर :  ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्याचे कार्य गेल्या ३५ वर्षापासून गंगाधरराव साकोळकर पाटील विद्यालयाच्या माध्यामातून होत आहे. विविध क्षेत्रात आपल्या विद्यालयाचे विद्यार्थी कार्यरत आहेत. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विभागामार्फत विविध उपक्रम राबवून खेळाडूंना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून आज आपल्या भागातील खेळाडूंसाठी क्रीडांगणावरील २०० मी.चा धावणपथाचे भुमीपुजन केले असुन यामुळे या भागातील खेळाडुंना फायदा होईल कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर प्रामाणिकपणे कष्ट केल्यावरच आपणास यश मिळते असे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.


ते देवर्जन ता.उदगीर येथील गंगाधरराव साकोळकर पाटील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने आयोजीत शाळेच्या क्रीडांगणावरील २०० मी.चा धावणपथच्या भुमिपुजनाप्रसंगी बोलत होते.


यावेळी संस्थाअध्यक्ष शिवाजीराव पाटील, संस्था सचिव ओमप्रकाश साकोळकर, 

माजी सभापती सिद्धेश्वर पाटील,  तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, डाॅ.सुलभा पाटील, सौ.करुणा पाटील, उमेश पाटील, वसंत पाटील, बसवराज रोडगे, शंकर रोडगे, व्ही.एस. कुलकर्णी, युवराज धोतरे, सरपंच अभिजित साकोळकर, नजीर हाशमी, पृथ्वीराज शिवशिवे, समद शेख, ईश्वर खटके,दयानंद रोडगे, गंगापुरचे सरपंच भुषण बिरादार, शेकापुरचे सरपंच विठ्ठल शेळगे, भाकसखेड्याचे लिंबाजी खेडकर, विवेक जाधव, सुमठाणचे शाहुराज किंवडे, राम बिरादार, अनिल रोडगे, नारायण रोडगे, प्राचार्य शिरुरे, मुख्याध्यापिका रंजना लद्दे, आदी उपस्थित होते.


पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर मतदार संघामध्ये हजारो कोटींची विकास कामे चालु असुन आपण विविध शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या दृष्टीने उभारले आहे. आता आपल्या उदगीरचा विकास जिल्ह्याच्या धर्तीवर केला असुन जिल्ह्याच्या दृष्टीने आपण पहिले पाऊल टाकत प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केले आहे. त्याचा नंबर ही आपणास एम.एच.५५ मिळाला असुन आता महाराष्ट्रात उदगीरची एक नवी ओळख निर्माण झाली आहे. तर ९५ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माध्यामातुन

उदगीरची ओळख जगामध्ये गेली असुन

मागील काळात विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा आयोजीत करुन या भागातील नागरिकांना एक बौध्दीक मेजवानी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

यश मिळवायचे असेल तर आपले ध्येय ठरवुन त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवुन तशीच कृती केल्यास जीवनात यशस्वी होता येते असे सांगून.

आपल्या विद्यालयात इनडोअर स्टेडियम उभारावे जेणे करुन ग्रामीण भागातील विद्यार्थी देशपातळीवर आपल्या भागाचे नाव करतील असा विश्वास ना.बनसोडे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिता येलमटे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक दिलीप कांबळे यांनी मानले.

यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.