दंडाधिकार वर्तमान पेपर व न्युज चे संपादक अर्जुन डी जाधव यांची महाराष्ट्र प्रसिध्दी प्रमुखपदी निवड
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
महाराष्ट्रात गोरगरीब जनतेचा कैवार घेऊन दिन दुबळ्यांना कायदेशीर आधार देऊन आत्याचाराला धडा देणारी व संविधानिक मुल्यांचे रक्षण व अंमलबजावणी करुन देण्यासाठी सर्वांना संविधानिक मुल्य व प्रचलित कायद्याची जाणिव करुन देण्यात मानवी हक्क अभियान ही संघटना अग्रेसर असुन या संघटनेने आतापर्यंत अनेक प्रकरणी गोर गरीबांना कायदेशीर न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले आहे,१९९० साली या संघटनेची स्थापना मा.एकनाथ आव्हाड यांनी केले असुन त्यांच्या पश्चात या संघटनेचे नेतृत्व जागतिक पातळीवरचे विचारवंत मा.डा.मिलींद आव्हाड हे करीत असुन या प्रभावशाली संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहेत,या संघटनेचा तिन पिढ्यांपासून अनेक सामाजिक प्रश्नावर लढा चालु असुन अनेक प्रश्न सोडवणुकीत या संघटनेला यश आले आहे दि.२८/७)२०२४ रोजी लातुर जिल्हातील औसा शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्ता कायदे विषयक शिबीराचे आयोजन संघटनेचे लातुर जि.आध्यक्ष अनंत साळुंखे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दत्ताभाऊ गायकवाड यांनी केले होते तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक स्थानी मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्रभाऊ गवाले हे उपस्थित होते,या कार्यक्रमास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातले मानवी हक्क अभियानाचे कार्यकर्ते उपस्थित होते,दंडाधिकार न्युज चैनलचे संपादक मा.आर्जुन जाधव,लातुर जि.सचिव मारुती गुंडीले,लातुर जि.संघटक लक्ष्मण रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.सरकारने पोलिस कायद्यात केलेले बदल या संबंधी सविस्तर माहिती देण्यात आली,तर मानवी हक्क अभियानाच्या कार्यकर्तेंचे कर्तव्य आणि कार्य यासंबंधी तसेच संविधानिक मुल्या आधारीत निर्माण झालेले कायदे व त्यांचे साकारात्मक परीणाम यांची सखोल माहिती ही मार्गदर्शकांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिली,या कार्यक्रमात सर्व कार्यकर्ते व मार्गदर्शकांच्या उपस्थित मानवी हक्क अभियानाच्या महाराष्ट्राच्या प्रसिद्धी प्रमुख पदी दंडाधिकार न्यूज चैनलचे संपादक मा.आर्जुन जाधव यांची निवड ही करण्यात आली,हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले आहे,या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी विधी सल्लागार, पोलिस कर्मचारी,कायदे विषयक अनुभवी मंडळी उपस्थित होते. लातूर,उदगीर,देवणी,जळकोट, निलंगा,औसा,धाराशिवसह विविध भागातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.या कायदे विषयक शिबीरात अनेक मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन करून मानवी हक्क अभियानाच्या कार्याची दखल घेत अभियानास सहकार्य करण्याचे अश्वासन यावेळी दिले.या कायदे विषयक शिबिरात जळकोट ता. महिला आघाडी अध्यक्षा आश्विनी वाघमारे, देवणी ता.आध्यक्ष गजानन गायकवाड,श्रीमती पूजा साहेबराव इंगळे,अनिल घोडके,जळकोट ता.आध्यक्ष संग्राम घुमाडे,उदगीर ता.आध्यक्ष श्रीकांत सुर्यवंशी
,रूषिकेश जाधव,सुदाम सुर्यवंशी,उषा गिरी, पवीत्रा गिरी,सविता सुर्यवंशी,भाग्यश्री येरोळे,लता उदारे,सविता घंटामने,श्रीदेवी पोलकर,अश्विनी बिराजदार,पार्वती कुसूमकर,
निलाबाई पोळे,रोहीणी मोरे,राजाबाई भडके,माधव सुर्यवंशी,शिंदे गोंविद, बालाजी पटोळे, हरीभाऊ राठोड,डि एन,कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यशाळेत उपस्थित होते.
