उदगीर (एल.पी. उगीले)
महात्मा फुले विद्यालय अहमदपूर येथील सहशिक्षक तथा पत्रकार अविनाश देवकते यांना दै.चालु वार्ता महाराष्ट्र राज्य च्या वतीने पत्रकार क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा वृतसंकलन व लिखाणाबद्दल उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार 28 जुलै रोजी पुणे येथील मराठा चेंबर्स सभागृहात पुणे महानगरपालिकेच्या प्रथम महिला तथा पुणे शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या कमल व्यवहारे यांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी दै.चालु वार्ता चे मुख्य संपादक डी.एस.लोखंडे पाटील,बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले,माजी महापौर प्रशांत जगताप इस्कॉन टेम्पल चे अध्यक्ष श्री.प्रभुजी आम आदमी पक्षाचे चे नेते अनेक राजकीय, सामाजिक नेते या मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन प्रदान करण्यात आले.दै.चालु वार्ता च्या 3 ऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण व सत्कार सोहळाचे आयोजन या वेळी करण्यात आले होते.
पत्रकारिता क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार अंबादास आलमखाने, लक्ष्मण उगीले,जगदीश पचंडे, व्यंकट कणसे, किशोर डबेटवार,हाणमंत सोमवारे,निवृती जवळेसह अनेक पत्रकार व मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
