देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
युरोपियन युनियन व स्विसएड इंडियाच्या अर्थसाहाय्यातून आणि सहकार्याने ग्रामीण महिला विकास संस्था देवणी मार्फत आपल्या देवणी तालुक्यात विस गावामध्ये निर्धार समानतेचा प्रकल्प राबविला जात आहे, या प्रकल्पांतर्गत गाव पातळीवर पुरुष गट सदस्यांची प्रशिक्षण कार्यक्रम देवणी खुर्द येथे शनिवारी सध्याकाळी ७ वा आयोजित करण्यातआले होते पुरुष लक्ष गटाची प्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणामध्ये मंतेश कांबळे यांनी पुरुषांमध्ये टेन्शन व ताणतणाव व टेन्शन आल्यावर आपण काय करतो या विषयाच्या सविस्तर माहिती देण्यात आली, गिरीश सबनीस यांनी पुरुष एकत्र करणे व सर्वांना एकञ घेऊन आपल्या विचार बदलण्याची क्षमता असणे गरजेचे आहे कोणत्या प्रकारे माणसाला टेन्शन येईल हे कळत नाही त्याला सहज विचार करून त्या गोष्टीवर मार्ग काढणे म्हणजे टेन्शन आपल्या पुरुषांना सहज निघणारी गोष्ट नाही अनेक विचार करण्याची आजची गरज आहे आजचा हा विषय टेन्शन आलं म्हणजे विषय संपत नसतो त्यावर बारकाई काय आहेत आपल्या मधले शोधून काढले पाहिजे तरच विचार बदलू शकतो आपल्यात थोड्या थोड्याने परिवर्तन होऊ शकतो असे तानतणाव कमी करण्यासाठी व टेन्शन आल्यावर आपण कसे कमी करता येते याव सविस्तर माहिती देण्यात आली आहे, यावेळी गिरीश सबनिस यांचा लक्ष गटातील पुरुष माधव पाटे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले,तसेच गिरीश सबनीस, कृष्णा इंगोले, मंतेश कांबळे, अनिल कांबळे, माधव पाटे,रामकिशन उगिले, रामराव धनासुरे,दयानंद रणदिवे, माधव रणदिवे, छान मुराळे, व्यंकटेश उगिले, प्रभू काकनाळे,हुशेन शेख, बळी गरड, बब्बर शेख, कृष्णा मुराळे,अजेमखा पठान, श्रीरंग कांबळे, लक्ष्मण चामे,बळी मुराळे, ज्ञानोबा मेहञे, प्रेरक लक्ष्मण रणदिवे,तसेच पुरुष लक्ष गटातील पंचवीस पुरुष उपस्थित होते,
