उदगीर (एल.पी.उगीले) प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आ.बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या नंतर सक्रिय कार्यकर्त्यांची कार्यशैली आणि कार्य अहवाल विचारात घेऊन उदगीर तालुका अध्यक्ष रवी बेळकुंदे यांच्या पुढाकाराने शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमित खंदारे यांची निवड उदगीर शहर संपर्कप्रमुख पदी करण्यात आली.
बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे व महाराष्ट्र कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, लातूर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर च्या शहर संपर्क प्रमुख पदी अमित खंदारे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र ग्रामिण जिल्हाध्यक्षा कांचन भोसगे,जिल्हा उपाध्यक्ष प्रेमलता भंडे, तालुकाध्यक्ष विजयमाला पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही या निवडीबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
