उदगीर (एल. पी. उगिले)
संत, महंतांची सेवा आपल्या हातून होणे म्हणजे आपली भाग्य आहे. कारण संतांच्या सेवेमुळे आत्मिक आनंद प्राप्त होतो. सामाजिक जाणीवा जपताना नवीन ऊर्जा प्राप्त होते. असे विचार उदगीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरशेळकी येथील धोंडू तात्या च्या दर्शनासाठी जाणाऱ्या असंख्य भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय भाऊ बनसोडे यांनी स्वतः तेथे थांबून भाविक भक्तांना साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप केले. अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल बाळासाहेब पाटोदे मित्र मंडळाचे त्यांनी कौतुकही केले.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते बाळासाहेब पाटोदे, अभंग जाधव, सतीश पाटील मानकीकर, अशोक कांबळे, धीरज कसबे, अंकुश ताडपले, पंकज कालनी, राहुल अतनुरे, राजू घोरपडे, विजय चिखले, विक्रम सूर्यवंशी, विकास बिरादार, गणेश मुंडकर, करण मोरे, ऋषिकेश पाटील, अजित फुलारी, अमोल पाटील, अदनान जादूगार, नारायण कोयले, विजयकुमार बामणीकर, ज्ञानेश्वर बिरादार, पवन ढोबळे, प्रतीक पाटील इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व उपस्थितितांचे संयोजक या नात्याने बाळासाहेब पाटोदे यांनी आभार व्यक्त केले.
