दप्तर मुक्त अभियान अंतर्गत श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांचा सन्मान,
विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव लौकिक केले शशिकांत नादरगे यांनी शाळा विद्यालय हे मंदिर आहे या मंदिरामध्ये शिक्षकाने चांगल्या यशाकडे पाठवले,
देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी -- श्री योगेश्वरी देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवणी येथे दप्तर मुक्त अभियाना अंतर्गत माजी यशस्वी विद्यार्थी श्री शशिकांत बालाजी नादरगे यांचा सत्कार करण्यात आला. वाघमारे वैष्णवी, शेख फिजा, कांबळे रोहिणी अंजली ढेके सूर्यवंशी चांदणी व मिळकुंदे ऋतुजा या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले शैक्षणिक वर्ष २००६-०७ या वर्षी शशिकांत इयत्ता बारावी कला शाखेतून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे. त्यानंतर त्याने उदगीर येथे बीसीए चे शिक्षण घेतले व तसेच पुणे येथे एमबीए( आयटी )चे शिक्षण पूर्ण केले आणि पुणे येथे ओरिएंटल रबर इंडस्ट्री, पुणे एसीजी फार्मा टेक्नॉलॉजी, पुणे व मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे अशा विविध कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून यशस्वीपणे काम केलेले आहे. याप्रसंगी त्यांचे वडील श्री बालाजी नादरगे व तसेच दुर्गेश्वरी दशरथ बिरादार या अकरावी वर्गातील विद्यार्थ्यांची आई शशिकला दशरथ बिरादार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक मा. आदित्य यशवंतराव पाटील, राजकुमार हरकचे, नागनाथ हुमनाबादे, शंकर पाटील, विक्रम बिरादार,आनंद घोणसे,राठोड सर, बिरादार सर, माका सर, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते,याप्रसंगी इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेतील उपस्थित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व नवीन वर्गामध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्राध्यापक शेख शौकत व सत्कारमूर्ती शशिकांत नादरगे यांचे कला शाखेतील विद्यार्थ्यांचे समृद्ध भारत घडवण्यातील योगदान या विषयावर मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मलवाडे रामदास यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शेवाळे सर व प्राध्यापक सतीश बिराजदार यांनी मोलाचे योगदान दिले.
