देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
लातुर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या शिवाजी नगर तांड्यावर मानवी हक्क अभियानाची बैठक घेण्यात आली या बैठकीचे आयोजन केले होते विश्वनाथ आडे यांनी तर ही बैठक तुळशीराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,या बैठकीला मार्गदर्शक म्हणून मानवी हक्क अभियानाचे लातुर जि.सचिव मारुती गुंडीले,सह लातुर जि.संघटक लक्ष्मण रणदिवे हे उपस्थित होते तर या बैठकीत प्रमुख उपस्थिती होती मानवी हक्क अभियानाचे जळकोट तालुका सचिव अनिल घोडके,जळकोट तालुका सह सचिव हरीभाऊ राठोड तसेच संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते सटवाजी वाघमारे,अविनाश तोगरे,संघटनेच्या जळकोट ता.महिला आघाडी अध्यक्षा अश्विनीताई वाघमारे इत्यादीची.निवासी अतिक्रमणे कायम करुन घेणे,गायरान जमीन नावावर करुन घेणे,आणि याबाबद सरकारची धोरणे आणि मानवी हक्क आभियानाची भुमिका व याबाबद संविधानाने दिलेले अधिकार इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली,तांड्यावर घरासाठी अतिक्रमण करुन रहात असलेल्या तांड्यावरील लोकांचा प्रश्न व गायरान धारकांचे प्रश्न या दोन मुद्द्यावर लढा उभारणेचा ठराव या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला तब्बल तीन तास भर पावसात ही बैठक शांततेत चालली सर्व तांड्यावरील बांधवांनी त्यांच्या हक्क अधिकाराचा लढा मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने चालवावे अभियानाची महाराष्ट्रभराची शक्ती तुमच्या बरोबर आहे असे वक्तव्य संघटनेचे मारुती गुंडीले यांनी यावेळी केले, काबाडकष्ट करुन मरणे एवढे जीवन नाही तर जीवन जगत असतांना संघटनेने चालविलेल्या जनकल्याण व न्यायाच्या कामासाठी प्रत्येकांनी वेळ देऊन आपले प्रश्न सोडवुन घ्यावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले,या बैठकीस शिवाजी नगर तांड्याचे रहिवासी तुळशीराम जाधव, विश्वनाथ आडे,उत्तम जाधव, हनुमंत आडे,जमला राठोड, लक्ष्मण जाधव,जनाबाई राठोड,मुक्ता जाधव,विमलताई जाधव, कमळ बाई राठोड,कौशल्यबा जाधव, उज्वला जाधव,घुमशाबाई जाधव, इत्यादी उपस्थित होते या बैठकीत मानवी हक्क अभियानाच्या गावकमीटीचे अध्यक्ष म्हणून तुळशीराम जाधव,व कार्याध्यक्ष म्हणुन विश्वनाथ आडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असुन या निवडीबाबद अभिनंदन करुन प्रमुख उपस्थितांनी शुभेच्छा ही दिल्या आहेत.
