उदगीर (एल. पी.उगीले) उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात ढवळाढवळ करून न्यायालयीन लढाई जिंकून निवडणूक लढलेले, आणि जिंकलेले बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांना अपात्र ठरवण्याच्या संदर्भात जिल्हा निबंधकाकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये राजकीय हस्तक्षेप करून शिवाजीराव हुडे आणि इतर चार संचालकांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्याच्या विरोधामध्ये अपात्र ठरलेल्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. सदरील याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर, जिल्हा निबंधक कार्यालयामध्ये नैसर्गिक न्याय प्रक्रियेला फाटा देऊन संचालकाचे म्हणणे ऐकल्याशिवाय निकाल दिल्या प्रकरणी विधिज्ञांनी युक्तिवाद मांडल्यानंतर न्यायालयाच्या वतीने तो निकाल रद्दबातल करण्यात आला असून आवश्यक त्या सूचनासह या प्रकरणांमध्ये लवकरात लवकर निकाल देण्याच्या सूचना देऊन हे प्रकरण पुन्हा जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. हा एका दृष्टीने महाविकास आघाडीला मिळालेला न्याय आहे असे विचार उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केले.
ते उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व चार संचालकांच्या अपात्रतेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने जिल्हा निबंधक औरंगाबाद यांचे आदेश रद्द करून सभापती व संचालक यांना पूर्वपदावर स्थापित केल्याबद्दल उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला, व एकमेकाला पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. डॉ. शिवाजीराव मुळे, काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष शीलाताई पाटील, काँग्रेस कमिटीच्या प्रदेश सरचिटणीस उषाताई कांबळे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मंजूर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, अजित पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत टेंगेटोल, उदगीर पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानोबा गोडभरले, आशिष पाटील, नाना ढगे ,कैलास पाटील, सतीश पाटील मानकीकर, श्रीकांत पाटील , बाजार समितीचे संचालक ॲड.पद्माकर उगीले, संतोष बिरादार, व्यापारी सुनील पाटील, व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी ,प्रमोद पाटील, गौतम पिंपरी ,सोनू पिंपरे यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन व प्रास्ताविक विधीज्ञ पद्माकर उगीले यांनी केले.
