शाहूवाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय शिक्षण धोरण : २०२०च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त 'शिक्षण सप्ताह : शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव' अंतर्गत रयत शिक्षण संस्था संचालित मलकापूर हायस्कूल व श्रीमान ग. रा. वारंगे ज्युनिअर कॉलेज, मलकापूरच्यावतीने सप्ताहाचा आजचा चौथा दिवस 'सांस्कृतिक दिन' म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज गुरुवार (ता. २५) रोजी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता अकरावी (कॉमर्स, तुकडी : क) मधील विद्यार्थी आयुष विलास चौगुले याने मूक अभिनयाचे सादरीकरण करून आपल्या शालेय मित्र-मैत्रिणींच्या अमाप टाळ्या मिळवल्या. कु. सनम इब्राहिम जेठी या इयत्ता बारावी (कला, तुकडी : क) मधील विद्यार्थिनीने कथाकथनच्या माध्यमातून आयुष्यातील विनोदी प्रसंगांची गुंफण करून हास्याचे धुमारे उडवले. इयत्ता अकरावी (कॉमर्स, तुकडी : क)ची विद्यार्थिनी कु. प्रीती नामदेव उमासरे हीने अभिजात लोककला सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. पोटाची खळगी भरायला ग्रामीण भागातील लोकांना काय काय करावे लागते हे इयत्ता बारावी (कला, तुकडी : अ)च्या ओम दीपक खोत नामक विद्यार्थी-कलावंताने आपल्या एकपात्री प्रयोगातून दाखवले. श्रीयुत ओम याने साकारलेली अनोखी भूमिका उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरली. 'वन्स मोअर'च्या आरोळ्या देऊन रसिक विद्यार्थ्यांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. तसेच कु. अक्षता कुमार पाटील (इयत्ता बारावी - सायन्स, तु. 'अ'), कु. वैष्णवी दिलीप चावरे (इयत्ता बारावी - सायन्स, तु. 'ब'), कु. पूजा सर्जेराव गुरव (इयत्ता बारावी - सायन्स, तु. 'अ'), कु. पुनम शामराव पाटील (इयत्ता बारावी - सायन्स, तु. 'अ') आणि कु. स्नेहल राजेश चव्हाण (इयत्ता बारावी - सायन्स, तु. 'अ') या विद्यार्थिनींनी सामुदायिक गायन करून उपस्थितांची मने जिंकली.
उक्त उपक्रम मा. सचिव, भारत सरकार, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली, मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण, पुणे, मा. विभागीय शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर तसेच मा. शिक्षणाधिकारी, कोल्हापूर यांच्या आदेशान्वये आयोजित करण्यात आले. दिनांक २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान संपन्न होत असलेल्या शिक्षण सप्ताहांतर्गत आजच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांची अंतर्दृष्टी, सामुदायिक भावना वाढीस लागावी शिवाय विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे, सहकार्य वाढीस लागावे या उद्देशाने हे उपक्रम घेण्यात आले. सदरील उपक्रमांमुळे शालेय वातावरण चैतन्यमय आणि आनंददायक बनल्याचे दिसून आले. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुण, सर्जनीशीलता आणि अभिव्यक्तीला वाव देण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. शिवाप्पा पाटील म्हणाले की, शाळा-महाविद्यालयांत असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केल्याने पारंपरिक कलेची जोपासना होते. अशा कलांचा वैभवसंपन्न वारसा चिरंतनपणे जतन करण्यासाठी आजच्या पिढीने पुढे येण्याची गरज आहे. नव्या पिढीने आधीच्या पिढीने जपलेली कला वृद्धिंगत केली पाहिजे. यासाठी शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांत उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असेही आवाहन श्री. पाटील यांनी केले. उपक्रमांत सहभागी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे प्रभारी प्राचार्य एस. व्ही. कुंभार, उपप्राचार्य दत्ताजीराव कुराडे यांनी कौतुक केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. एस. पाटील यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
[5:58 PM, 7/25/2024] Ugile Sir: 👆
