राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी विभागात दिनांक २२-७-२०२४ वार सोमवार प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवासाठी उपस्थित अध्यक्षस्थानी सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं आशाताई बेंजरगे मॅडम प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या सौ. सुनीताताई दुम्पलवार मॅडम, कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित पालक प्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी माननीय श्री गजेंद्र भोसले सर, गुरु द्रोणाचार्य यांच्या वेशभूषेत स्वयं कुलकर्णी, गुरुभक्त एकलव्य यांच्या वेशभूषेत आदिराज थोटे वरील सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महर्षी वेद व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले. सुमधुर आवाजात स्वागत गीत सोनाली चौधरी मॅडमने सादर केले गुरुपौर्णिमेसाठी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करत हृदयातील पूजनीय श्रद्धास्थान आ. सौ.आशाताई बेंजरगे मॅडमला आपले श्रद्धास्थान मानणाऱ्या सौ. मंगल वाडकर मॅडमने सौं.आशाताई बेजरगे मॅडमचा भेट वस्तू देऊन व्यक्त केला गुरुप्रती आदरभाव मंच्यावरील उपस्थित मान्यवरांचा सुंदर शब्दात परिचय सौं. नीता गडीकर मॅडमने करून दिला.आदरणीय सौं आशाताई बेंजरगे मॅडमने शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच विद्यालयात राबवित असलेले विविध उपक्रम विद्यार्थ्यांची शिस्त याबाबत सखोल माहिती प्रास्ताविकेत मांडली.सुंदर गुरुवर्य गीत सविता तोगरे मॅडमने सादर केले. गुरुपौर्णिमेची सखोल माहिती सौं नीता गडीकर मॅडमने सादर केली. सहशिक्षिका भक्ती कुलकर्णी मॅडम तसेच विद्यार्थी कु.आरोशी भोसले, निवान कारभारी, खुशी शिंदे,मंगेश शेरे यांचे वाढदिवस विद्यालयात साजरे करण्यात आले. पूर्व पहिलीते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुवर सुंदर भाषणे सादर केली. इयत्ता तिसरी वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांची जोडी करून सुंदर वेशभूषा सादरीकरण केले. त्यामध्ये गुरुद्रोणाचार्य स्वयं कुलकर्णी, एकलव्य अधिराज थोटे,स्वामी विवेकानंद जयराज फुलारी, रामकृष्ण परमहंस -पार्थ मुस्कावाड विद्यार्थ्यांचा समावेश होता. पूर्वपहिली एकलव्याची वेशभूषा- समर्थ पिंपळे वर्ग पहिली सिंहगड कक्ष सचिन तेंडुलकर यांच्या वेशभूषेत वेदिका बिरादार तर रमाकांत आचरेकर यांच्या वेशभूषेत आरोही बिरादार अशा गुरु शिष्यांच्या विविध वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते. सुंदर गुरु गीत आदित्य मुसनेने सादर केले. श्रीनिवास बडीहवेलीने कथा सादर केली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरु शिष्यावर आधारित अप्रतिम नाटिका सादर केली. नाटीकेला सौ.आशाताई बेंजरगे मॅडमने नाटिकेसाठी शंभर रुपयाचें बक्षीस सो.मंगल वाडकर मॅडमला देऊन कौतुक केले.माननीय श्री गजेंद्र भोसले सरांनी विद्यालयात राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. सौं.सुनीता दुम्पलवार मॅडम मार्गदर्शन कर म्हणाल्या गुरुजींनी शिकवलेले ज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजे अशा संदेश दिला. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुवंदना करून पुष्प अर्पण करून भेटवस्तू दिल्या. सो आशाताई बेंजरगे मॅडमने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचें सूत्रसंचालन जयश्री स्वामी तर आभार सुजाता महाजन मॅडमने मांडले. सर्व शिक्षक, पालक विद्यार्थी यांच्या समवेत गुरु पौर्णिमेचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.
