देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तालुक्यातील सी एस सी सेंटर चालक व महा ऑनलाईन सेंटर चालकांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात देवणी तहसीलदार यांना दिनांक 08/07/2024 रोजी निवेदन देऊन एक दिवस तालुक्यातील सर्व सी एस सेंटर बंद ठेवण्यात आले होते, सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की २०११ पासून सर्व शासकीय दाखले देत आहोत त्यांचे दर वाढवण्यात यावे, शासनाच्या विविध योजना मोफत दिल्यानंतर त्यांच्या मोबदला महिना अखेर देण्यात यावा, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे कार्य ऑनलाईन करण्यासाठी सीएससी संचालकाला मोबदला निश्चित करून देण्यात यावा, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेचे कार्य ऑनलाइन करण्यासाठी सीएससी आयडी पोर्टलवर लिंक ओपन करून देण्यात यावी, पिक विमा कमिशन ५० रुपये प्रति फॉर्म प्रमाणे त्वरित जमा करण्यात यावे, अशा विविध मागण्यासाठी देवणी तालुक्यातील सर्व सीएससी सेंटरवर व महाऑनलाईन सेंटर च्या वतीने देवणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी ऑनलाइन संचालक अध्यक्ष किशोर बेलुरे, सईद पठाण, अनिल शिंदे, खुदबुद्दीन शेख, जीवने शिवशंकर, दयानंद कांबळे, राजीव माळवे, कासले लखन, साईनाथ गायकवाड, सोमनाथ रावळे, दत्ता काकडे, शादुल बॉडी वाले बौडीवाले, यांच्यासह तालुक्यातील अनेक सीसी सेंटर चालक उपस्थित होते
