देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
देवणी तलुक्यातील सर्व शेतकरी बाधवाना विनती करण्यात येते की,जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना कडबा कुटी सयंत्र, स्लरी फिल्टर ,बीज प्रक्रिया ड्रम ,सोयाबीन टोकन यंत्र अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहे .रब्बी हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ ,तुर मररोग नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येणार आहे .यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२४ पर्यंत पंचायत समिती देवणी येथे अर्ज करण्याचे आव्हान गटविकास अधिकारी श्री किरण कोळपे आणि कृषी अधिकारी डी.बी. हैबतपुरे. व विस्तार अधिकारी गोपणवाड जी एन यांनी केले आहे .या योजनेमध्ये अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती, अल्पभूधारक शेतकरी व महिला शेतकरी यांना प्राधान्य राहील ,इच्छुक शेतकऱ्यांनी स्वतःचा सातबारा, आठ अ ,आधार कार्ड ,बँक पासबुक च्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत ,तसेच लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थ्यासाठी व्यंगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स संबंधित पंचायत समितीकडे देवून,अर्ज करावेत लाभार्थ्याची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील .
खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बी आय एस अथवा अन्य संस्थांनी निश्चित केलेल्या प्रमाणका नुसार तांत्रिक निकषानुसार असावीत रब्बी हरभरा पिकासाठी जिवाणू संवर्धक संघ तुर मररोग नियंत्रणासाठी बायोमिक्स एक हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येईल व यांचा पुरवठा पंचायत समिती स्तरावरून करण्यात येईल अवजारासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्याची निवड संबंधित पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल .मंजूर अवजारांचे अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे अदा करण्यात येईल असेआव्हान कृषी अधिकारी हैबतपुरे डीबी यांनी केले आहे.
