देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे
मुबई येथे विधानभवनावर मानवी हक्क अभियानाचा मोर्च्याचा आक्रोश राज्य स्तरीय पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधुन गायरान जमिनीच्या प्रश्न सोडवणुकीसाठी प्रचंड मोर्चा मानवी हक्क अभियानाचे राष्ट्रीयध्यक्ष मा.मिलिंद अव्हाड,नाना,कार्याध्यक्ष दादासाहेब क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.तर या मोर्चाचे नेतृत्व केले मानवी हक्क अभियानाचे मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र भाऊ गवाले यांनी.या मोर्चात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी यांचेसह अनेक गायरान धारक उपस्थित होते,१ गायरान धारकांच्या जमिनीवरील प्रकल्प रद्द करा.२जलवायु परिवर्तन हा मुलभूत अधिकारात समाविष्ट करा.३गायरान जमिनी भुमिहिनांच्या विनाअटी ७/१२ देण्यात यावे,४वनविभागा मार्फत अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर करण्यात येणारी वृक्ष लागवड बंद करण्यात यावे,५ दलित बजेटचा कायदा पास करण्यात यावा ६ निवासी अतिक्रमणे कायम करण्यात यावे,७ रमाई आवास योजनेच्या घरकुलास प्रत्येकी १०लाख रुपये देण्यात यावे,८ अ,ब,क,ड आरक्षण वर्गीकरण करुन त्याच्या तरतुदी साठी राज्य शासनाने ठराव मांडून केंद्र शासनाकडे पाठवावे ९ आर्टी साठी आवश्यक बजेटची तरतुद करुन ते १आगष्ट रोजी सुरु करावे,१० अण्णाभाऊ साठे महामंडळ व इतर महामंडळाना आवश्यक त्या तरतुदी करुन त्या पुर्ववत सुरु करावे ११ उसतोड कामगारांना आवश्यक त्या सोयी सवलती देऊन ५००/-रुपये टना प्रमाणे मजुरी देण्यात यावी,१२ दलित अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटना पहाता जिल्हा निहाय फास्ट ट्रॅक कोर्ट सुरु करुन पिडीतांचे आवश्यक ते पुनर्वसन करावे,१३) हवामान बदलामुळे sc/st समुदयावर होणार्या परिणामाची शासनाने दखल घ्यावी,इत्यादी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या आहेत,या मोर्चात प्रामुख्याने मानवी हक्क अभियानाचे मा.धोंडीराम पाटोळे मराठवाडा उपाध्यक्ष रघुनाथ कसबे मराठवाडा समन्वयक,माणिक गाडेकर अमरावती जि.आध्यक्ष,संतोष लोखंडे वाशिम जि.आध्यक्ष,अनिल धुरदेव अकोला जि.आध्यक्ष,विजय भालेराव यवतमाळ जि.आध्यक्ष,देविदास कवचर बुलढाणा जि.आध्यक्ष),भारत बळवंते हिंगोली जि.आध्यक्ष, पप्पुराज शेळके परभणी जि.आध्यक्ष जगण चव्हाण परभणी पारधी समाज नेते, अंकुश सोनवणे जालना जि.आध्यक्ष,आनंत साळुंखे लातुर जि.आध्यक्ष,विशाल घोडके धाराशिव जि.आध्यक्ष,मधुकर कांबळे व विष्णु मजमुले बीड जि.मानवी हक्क अभियान,देविदास अवचर बुलढाणा जि.आध्यक्ष,दिंगबर गायकवाड नांदेड जि.आध्यक्ष, संघमित्रा गवळे नांदेड जि.म.अध्यक्ष ,राधिका चिंचोलीकर हिंगोली जि.म.आध्यक्ष,मारुती गुंडीले लातुर जि.सचिव,गोपाळ साळुंखे,विलास भोसले लातुर जिल्हा लक्ष्मण रणदिवे लातुर जि.सघटक इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते,ही माहिती मानवी हक्क अभियानाचे लातुर जि.सचिव मारुती गुंडीले यांनी प्रसिद्धी माध्यमाला दिली आहे,
