Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा - पंडित जाधव




उदगीर (एल. पी. उगिले )

महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मदतीचा हात म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या जनजागृतीसाठी महसूल विभागाच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा, हेर या भागात गावोगावी मार्गदर्शनासाठी जनजागृती शिबिराचे आयोजन केले जात आहे. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंडलाधिकारी पंडित जाधव यांनी केले आहे. 

उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी ग्रामसेवक गजेंद्र भोसले, तलाठी अंकुश वडगावे, सरपंच सौ. महादेवी कांबळे, उपसरपंच शंकरआप्पा भातमोडे, ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील, गणपत कांबळे, पर्यवेक्षक  गायकवाड ताई , चेअरमन शेषराव शेळके, अंगणवाडी ताई मंगला स्वामी, शामा कुंभार, मीना मिळकुंडे, आशा मीरा पाटील, नागिन बाई खरटमोल, राजश्री सामनगावे, मदतनीस राहुल रक्षाळे, पोलीस पाटील दिलीप पाटील, विठ्ठल पाटील, संदीप मुळे, मुकेश सोनटक्के, बालाजी कल्लूरे, अमीन शेख, प्रकाश होळकर, संतोष कांबळे, गणेश कारभारी, मनोहर देवंग्रे तसेच गावातील प्रतिष्ठित महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी गजेंद्र भोसले यांनी केले. याप्रसंगी सविस्तर मार्गदर्शन मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य मोहन पाटील यांनी केले. एकाच मार्गदर्शन शिबिरात 368 अर्ज प्राप्त करून ते अपलोड करण्यात आले. लोहारा गावात एकूण 1376 महिला पात्र आहेत, त्यांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.